घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात आज एकही ओमिक्रॉन रुग्ण नाही

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात आज एकही ओमिक्रॉन रुग्ण नाही

Subscribe

राज्यात आज 27,377 कोरोना रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ते सुखरुप घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 70,67,955 इतकी आहे.

राज्यासाठी आज दिलासादायक बाब म्हणजे आज रविवारी राज्यात एकही ओमक्रॉन बाधित रुग्ण आढळलेला नाही.  राज्यात आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या ओमिक्रॉन बाधितांची संख्या ही 2,659 इतकी आहे. यातील 1,009 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. आज ओमिक्रॉन रुग्णांपासून राज्याला दिलासा मिळाला असला तरी कोरोना बाधितांची संख्या मात्र 40 हजारांच्या घरात पोहोचली आहे. आज राज्यात 40,805 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यात आज 27,377 कोरोना रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ते सुखरुप घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 70,67,955 इतकी आहे. राज्याच्या सध्याचा रिकव्हरी रेट हा 94.15टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,33,69,912 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 75,07,225 चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत.

त्याचप्रमाणे राज्याचा सध्या मृत्यूदर कमी असला तरी आज 44 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात सध्या 20,86,024 रुग्ण हे होमक्वारंटाइन असून 3,373 रुग्ण संस्थात्कम क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या 2,93,305 अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

- Advertisement -
.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०३३९१५ ९९४८८९ १६५३५ २६८३ १९८०८
ठाणे ७४८७६९ ६९८४६८ ११६६९ ३५ ३८५९७
पालघर १६०२६० १५२७०७ ३३५८ १५ ४१८०
रायगड २३६३२७ २१८५५३ ४८५४ १२९१३
रत्नागिरी ८२६०८ ७९१९४ २५०६ ९०३
सिंधुदुर्ग ५५७४४ ५२८४३ १४५९ १५ १४२७
पुणे १३४५२०६ १२३५२६० १९९२३ ३५० ८९६७३
सातारा २६७०५६ २५१९७० ६५३० ३२ ८५२४
सांगली २१९६७५ २०८२२६ ५६४२ ५७९८
१० कोल्हापूर २१४२६२ २०४१६० ५८६० ४२३७
११ सोलापूर २१९४५६ २०८६६६ ५६३० ११३ ५०४७
१२ नाशिक ४४७८५५ ४२२४०९ ८७८२ १६६६३
१३ अहमदनगर ३५७४०४ ३३९९७१ ७१७६ ११ १०२४६
१४ जळगाव १४४७९६ १३८९१८ २७१८ ३३ ३१२७
१५ नंदूरबार ४२८४१ ३९६४८ ९५० २२४०
१६ धुळे ४८८८७ ४६३७८ ६५७ ११ १८४१
१७ औरंगाबाद १६६७१७ १५५३३९ ४२६५ १४ ७०९९
१८ जालना ६३३४६ ६०३२४ १२१८ १८०३
१९ बीड १०६४०८ १०२००८ २८४६ १५४७
२० लातूर ९९८६७ ९३३७७ २४५३ ४०३१
२१ परभणी ५४९७२ ५२१०८ १२३६ १९ १६०९
२२ हिंगोली १९६६९ १८४३८ ५०८ ७२२
२३ नांदेड ९८१५८ ९११५९ २६६३ ४३२९
२४ उस्मानाबाद ७१३७० ६७१४६ १९९३ ११६ २११५
२५ अमरावती ९९९६१ ९५२१३ १६०० ३१४६
२६ अकोला ६३२९३ ५९३५३ १४३२ २५०४
२७ वाशिम ४२९७६ ४१३८३ ६३७ ९५३
२८ बुलढाणा ८७२७० ८४८२४ ८१४ १६२६
२९ यवतमाळ ७८५६६ ७५१०५ १८०१ १६५६
३० नागपूर ५३४६४१ ५०१७३९ ९१३० ७१ २३७०१
३१ वर्धा ६१३८२ ५६९४३ १२२० १६५ ३०५४
३२ भंडारा ६३१४२ ५९८२२ ११२४ १० २१८६
३३ गोंदिया ४३१५१ ४१६१७ ५७३ ९५४
३४ चंद्रपूर ९४३०८ ८९१५९ १५७० ३५७५
३५ गडचिरोली ३२८२३ ३०६४७ ६७२ ३३ १४७१
इतरराज्ये/ देश १४४ ३१ १११
एकूण ७५०७२२५ ७०६७९९५ १४२११५ ३८१० २९३३०५

 


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत घसरण, मृत्यू संख्येत वाढ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -