घरमहाराष्ट्रतिवरे धरण दुर्घटना : दिवसाअंती १३ मृतदेह सापडले; ११ जण अजूनही बेपत्ता

तिवरे धरण दुर्घटना : दिवसाअंती १३ मृतदेह सापडले; ११ जण अजूनही बेपत्ता

Subscribe

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली वाहून गेली आहेत.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली वाहून गेल्याची घटना काल मध्यरात्री घडली. आज दिवसभर या धरणात वाहून गेलेल्यांचे शोधकार्य एनडीआरएफ पथकाकडून सुरू होते. सायंकाळी ही शोधमोहित थांबवण्यात आली. दिवसभराअंती एकूण १३ जणांचे मृतदेह एनडीआरएफ पथकाने शोधून काढले असून अजूनही ११ जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. आजच्या पुरते हे शोधकार्य थांबवले असले तरी उद्या पुन्हा बेपत्ता नागरिकांचा शोध एनडीआरएफ पथकाकडून घेतला जाणार आहे. दरम्यान, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

- Advertisement -

रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली वाहून गेली आहेत. आता पर्यंत या घटनेमध्ये २४ जण बेपत्ता झाले असून ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हाहाकार माजला असून किमान २४ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

धरणाला भगदाड पडले

गेल्या चार दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. मुंबईसह राज्यात पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून मालाड, पुणे, कल्याण या भागात भिंती कोसळून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली आहे. याचा फटका ७ गावांना बसला असून यामध्ये आतापर्यंत २४ जण बेपत्ता झाले आहेत. तर आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह हाती आले आहेत. चिपळूणमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे धरण भरुन वाहू लाागले. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि हाहाकार उडाला.

या गावांमध्ये घुसले पाणी

मिळालेल्या माहितीनुसार, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले आहे. या गावाची अंदाजे लोकवस्ती ३ हजार इतकी आहे. यामध्ये आतापर्यंत २४ जण वाहून गेल्यीची भीती माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. पाण्याचा प्रचंड वेग असल्याने काही घरेही वाहून गेल्याची भीती आहे.

एनडीआरएफला केले पाचारण

रत्नागिरी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. तात्काळ मदतकार्य सुरु करण्यात आले. त्यानंतर पुणे तसेच सिंधुदुर्गातून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. ही दुर्घटना अलोरेशिरगावच्या पोलीस चौकीच्या हद्दीत घडली असून स्थानिक पोलीस सुरुवातीपासूनच युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत.

गावांचा चिपळूणशी संपर्क तुटला

दादर पूल पाण्याखाली गेल्याने सातही गावांचा चिपळूणशी संपर्क तुटला आहे.

तिवरे धरणाला भगदाड

तिवरे धरणाला भगदाड

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜುಲೈ 2, 2019


हेही वाचा – कोंढवा इमारत दुर्घटना प्रकरण : ‘त्या’ व्यावसायिकांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

हेही वाचा – सम्राट बिल्डर्सच्या गृहप्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळली; ३ ठार तर २ जखमी


बेपत्ता असलेल्यांची नावे

या दुर्घटनेतील बेपत्ता लोकांची काही नावे हाती आली आहेत. लक्ष्मी आत्माराम चव्हाण (72), नंदाराम महादेव चव्हाण (65), अनंत हरिभाऊ चव्हाण (63), अनिता अनंत चव्हाण (58), रणजित अनंत चव्हाण (15), ऋतुजा अनंत चव्हाण (25), दुर्वा रणजित चव्हाण (15), आत्माराम धोंडू चव्हाण (75), पांडुरंग धोंडू चव्हाण (50), रवींद्र तुकाराम चव्हाण (50), रेश्मा रविंद्र चव्हाण (45), दशरथ रविंद्र चव्हाण (20), वैष्णवी रविंद्र चव्हाण (18), अनुसिया सीताराम चव्हाण (70), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (75), बळीराम कृष्णा चव्हाण (55), शारदा बळीराम चव्हाण (48), संदेश विश्वास धाडवे (18), सुशील विश्वास धाडवे (48) रणजित काजवे (30), राकेश घाणेकर(30)

‘दोषींवर कडक कारवाई करा’

चिपळूणमधील तिवरे धरण दुर्घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेली आहे. अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर सरकार जागे होणार आहे! असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारला केला आहे. तिवरे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करुनही या धरणाची दुरुस्ती न झाल्यामुळे आज धरण फुटुन गावं पाण्याखाली आहेत तर अनेक लोकं बेपत्ता आहेत असेही पाटील म्हणाले. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हायलाच हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -