घरमहाराष्ट्रनाशिकअतिवृष्टीमुळे रेल्वेसेवा खोळंबली; अनेक गाड्यांची नाशिकरोडला विश्रांती

अतिवृष्टीमुळे रेल्वेसेवा खोळंबली; अनेक गाड्यांची नाशिकरोडला विश्रांती

Subscribe

अनेक गाड्या रद्द : दलालांचे फावले, खासगी वाहनांचा पर्याय दुपटीने महाग

मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे मंगळवारी बहुतांश रेल्वेगाड्या नाशिकरोड व देवळाली स्थानकावर थांबविण्यात आल्या. यामुळे अनेक प्रवाशांनी खासगी वाहनांतून दुप्पट पैसे मोजत मुंबई गाठली. मुंबईतील लोकल रेल्वेसेवा बंद असल्याने अनेकांचे प्रचंड हाल झाले. नाशिकहून अनेकांनी जास्तीचे पैसे मोजत कसारापर्यंत टॅक्सी वा खासगी वाहनांनी प्रवास केला. मात्र, तेथून पुढे लोकलने जाऊ इच्छिणार्‍या प्रवाशांना सायंकाळपर्यंत ताटकळावे लागल्याचे दिसून आले.

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर दलालांचा सुळसुळाट दिसून आला. मंगळवारी अनेक रेल्वे रद्द झाल्याने व काही एक्सप्रेस गाड्या नाशिकरोड, देवळाली व ईगतपुरीत थांबविण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी खासगी बसेस तसेच अन्य वाहनांनी मुंबई गाठली. यात दलालांनी दुप्पट भाडे आकारून बंद रेल्वेसेवेमुळे चांदी करून घेतली. अतिवृष्टीने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. पावसाने मुंबईतील रेल्वेसेवा ठप्प झाली. प्रशासनाने अतिवृष्टीच्या कारणास्तव नियोजनात बदल केले. मुंबईतील लोकल सेवेबरोबरच बाहेर राज्यांतून येणार्‍या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही गाड्या मुंबईत न येता नाशिक, ईगतपुरी, देवळाली, दौंड, तळेगाव, पुणे परिसरातील रेल्वेस्थानकांवरच थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रस्ता वाहतुकीवरही याचा ताण पडल्याचे दिसून आले.

- Advertisement -

प्रवाशांना प्रशासनाकडून विनामूल्य चहा-नाश्ता

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी उशीर झालेल्या व मुंबई अगोदरच नाशिक, मनमाड, भुसावळ, देवळाली, ईगतपुरी या ठिकाणी थांबविण्यात आलेल्या गाड्यांतील प्रवाशांना विनामूल्य चहा-नाश्त्याची व्यवस्था करून देण्यात आली होती.

नियोजन सुरू

मुंबईला कुशीनगर विनाप्रवाशी मुंबईला पाठवून उद्यासाठी रॅक उपलब्ध होण्यासाठी पाठविली आहे. त्याचप्रमाणे गोदान व महानगरी, आसनसोल, दुरांतो एक्सप्रेस पाठविण्याचे नियोजन सुरू असून भरलेली किंवा रिकामी गाडी मुंबईकडे रात्री रवाना होणार आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. – आर. के शर्मा, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ

मंगळवारी या गाड्या झाल्या रद्द

  • रत्नागिरी दादर एक्सप्रेस (५०१०४/५०१०३)
  • राज्यराणी एक्सप्रेस (२२१०२/२२१०१)
  • मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस(१२१२७/१२१२८)
  • नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस(१७६१७/१७६१८)
  • मनमाड-एलटीटी एक्सप्रेस (१२११८/१२११७)
  • मुंबई-गडग एक्सप्रेस (१११३९)
  • मुंबई-गडग एक्सप्रेस(१११४०)३ जुलै
  • पंचवटी एक्सप्रेस (१२११०/१२१०९)
  • सिंहगड एक्सप्रेस(११०१०/११००९)
  • डेक्कन एक्सप्रेस(१२१२४/१२१२३)
  • सह्याद्री एक्सप्रेस(११०२३)

मुंबईबाहेर थांबवलेल्या गाड्या

  • नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ११४०२ (नाशिकरोड पर्यंत)
  • हुबळी-एलटीटी एक्सप्रेस १७३१७ (पुणे)
  • मडगांव-मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस १०११२ (पनवेल)
  • महालक्ष्मी एक्सप्रेस १७३१२ (पुणे)
  • विशाखापट्टणम् १८५१९ (पुणे)
  • सिद्देश्वर एक्सप्रेस १२११६ (दौंड)
  • गडग-मुंबई १११४० (पुणे)
  • टाटानगर-मुंबई २२८८६ (ईगतपुरी)
  • अमरावती-मुंबई १२११२ (देवळाली)
  • सह्याद्री एक्सप्रेस११०२४ (सातारा)
  • भुवनेश्वर-मुंबई ११०२० (कामशेत)
  • कन्याकुमारी-मुंबई १६३८२ (तळेगाव-पुणे)
  • हैद्राबाद-मुंबई १२७०२ (पुणे)
  • चेन्नई-मुंबई १२१६४ (पुणे)
  • पौन्डेचेरी-दादर ११००६ (पुणे)
  • लातुर-मुंबई २२१०८(दौंड)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -