घरताज्या घडामोडीअवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्तांसाठी ७५० कोटी

अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्तांसाठी ७५० कोटी

Subscribe

विधीमंडळ अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून तब्बल १६ हजार १२ लाख ६८२८ कोटींच्या पुरवण्या मागण्या सभागृहाच्या मंजूरीसाठी मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर गृहखात्यासाठी देखील भरीव तरतूद आहे. याशिवाय यामध्ये पोलीस मुख्यालयाच्या नुतनीकरणासाठी ५० लाख, दहशतवाद विरोधी पथकाच्या गुप्तसेवा निधीसाठी अतिरिक्त तरतूद १ कोटी, सायबर विभागातील पोलीसांच्या वेतन आणि भत्यासाठी १ कोटी ५० लाख, निर्भया योजनेतंर्गत फॉरेन्सिक लॅबचे सक्षमीकरणासाठी २६ कोटी ८५ लाख, परिवहन महामंडळाला विद्यार्थी सवलतीसाठी अतिरिक्त २७१ कोटी, भिवंडी दंगलग्रस्त भागातील झळ पोहोचलेल्या व्यक्तिंच्या पुनर्वसनासाठी १ कोटी ८० लाख ९६ हजार अशा खर्चाचा समावेश आहे.

‘या’ विविध कामांसाठी निधीची तरतूद

  • पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अग्रीम रकमेची भरपाई ४ हजार ५०० कोटी
  • अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७५० कोटी
  • कृषी उन्नती योजनेसाठी राज्याचा हिस्सा म्हणून १२ कोटी ९४ लाख ४५ हजार
  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ३९ कोटी २९ लाख
  • पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी ५०० कोटी
  • दूध भूकटी अनुदानासाठी १०० कोटी
  • मच्छिमार सहकारी संस्थांच्या हायस्पीड डिझेल विक्रीकरासाठी ५० कोटी
  • अनुसूचित जाती विशेष योजनांची अंमलबजावणीसाठी ८८ लाख
  • दुष्काळग्रस्त भागातील विद्याथ्र्यांच्या परिक्षा फि माफीसाठी २१ कोटी ३६ लाख ६० हजार
  • चंद्रपूर येथील सैनिकी शाळेच्या बांधकामासाठी ७६ कोटी
  • कोल्हापूर येथील श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिराच्या विकासर आराखड्यासाठी २ कोटी
  • मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो प्रकल्पांच्या मुद्रांकशुल्क अधिभारासाठी ४५० कोटी
  • सरकारी इमारतींच्या देखभालीसाठी ७० कोटी
  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या प्रकल्पांसाठी ४५० कोटी
  • खासगीकरणाच्या माध्यमातून बीओटी तत्वावरील रस्ते व पुलांसाठी ६०० कोटींचा अतिरिक्त निधी
  • बीडीडी चाळींच्या दुरूस्तीसाठी ८ कोटी
  • नाबार्ड कर्ज मंजूर झालेल्या रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी १०० कोटी
  • हायब्रीड अ‍ॅन्युयीटी अंतर्गत रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी १ हजार कोटी अतिरिक्त नीधी
  • समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजासाठी ५५० कोटी
  • पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ५०० कोटी
  • विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळासाठी २५० कोटी
  • संजय गांधी निराधार अनुदान लाभाथ्र्यांसाठी २०० कोटी
  • अंगणवाडी कर्मचायांच्या मानधनासाठी १५५ कोटी
  • मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाठी ९९ कोटी ६२ लाख ४० हजार
  • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ३० कोटी
  • विशेष मागासप्रवर्गातील विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीसाठी २५ कोटी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -