घरदेश-विदेशLive Updates : संभाजीराजे छत्रपतींचा उद्यापासूनचा कोल्हापूर दौरा रद्द

Live Updates : संभाजीराजे छत्रपतींचा उद्यापासूनचा कोल्हापूर दौरा रद्द

Subscribe

संभाजीराजे छत्रपतींचा उद्यापासूनचा कोल्हापूर दौरा रद्द


महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली

- Advertisement -

मविआची इंडिया आघाडी होऊ देणार नाही- प्रकाश आंबेडकर


नवी दिल्लीत आप आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले

- Advertisement -

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे समन्स मिळूनही चौकशीसाठी हजर न राहिल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले


झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 5 दिवसांची ईडी कोठडी

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे

31 जानेवारी रोजी हायव्होलटेज ड्राम्यानंतर सोरेन यांना ईडीनं अटक केली होती.


चंपाई सोरेन आज मुख्यमंत्री पदाची शपथ

झारखंडच्या राजकीय उलथापालथीत आज नवी ट्वीस्ट


पंतप्रधान मोदींच्या हस्ते १९ फेब्रुवारीला कोस्टल रोडचं उद्घाटन

१९ फेब्रुवारी रोजी कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या रस्त्याचं उद्घाटन होणार

वरळी ते मरीन ड्राईव्ह ह्या पहिल्या फेजच्या १० किलोमिटर रस्त्याचे लोकार्पण होणार

१५ मे पर्यंत दोन्ही फेज सुरु होणार असल्याची पालिका आयुक्तांची माहिती


इक्बाल सिंह चहल, पालिका आयुक्त

यंदाचा अर्थसंकल्प ५९ हजार ९५४ कोटी, कॅपिटल बजेट ३१ हजारांच्या जवळपास आहे

पालिकेचा प्रयत्न आहे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढला पाहिजे आणि रेव्हिन्यू एक्सपेंडिचर कमी झाला पाहिजे

२०२०-२१ मध्ये आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ७६ टक्के होता

आजच्या अर्थसंकल्पा पगारांवर आणि इतर गोष्टींचा खर्च ४८ टक्क्यांवर आलाय

तर कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी आता ५२-५३ टक्के खर्च होतोय

विकासासाठी अधिक पैसा आता आपण खर्च करतोय जी एक चांगली बाब आहे


मुंबई महापालिका बजेट 2024

आर्थिक वर्ष 2024-25 महापालिके कडून बजेट सादर

एकूण 59,954.74 कोटींचा बजेट सादर

महापालिकेकडून बजेटमध्ये आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वछता आणि प्रदूषणावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे


मुंबई महानगर पालिकेच्या एकूण मुदतठेवी 84824.07 कोटी

मुंबईच्या अर्थासंकल्पात साडेसहा हजार कोटींची एकूण घट


2024-25 मुंबई महापालिकेतील 7 स्मशानभूमींचे पीएनजी स्मशानभूमीत रुपांतर केले जाईल

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 9 स्मशानभूमींमध्ये (3 शहर, 3 पूर्व उपनगर आणि 3 पाच्छिम उपनगर) पारंपरिक चितेऐवजी पर्यवणपूरक दहांकरिता लाकूड ऐवजी नवीन चीता तयार करण्यासाठी 1716.85 कोटींची तरतूद


आरोग्यासाठीचे बजेट 14 टक्क्यांनी वाढले

यंदा आरोग्यासाठी 7 हजार 191 कोटी रुपयांची तरतूद


धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेसाठी 111 कोटी रुपयांती तरतूद

18 वर्षांवरील दिव्यांगासाठी अर्थसहाय्य योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची स्थापना

महिला सुरक्षा अभियान मुंबईत राबवले जाणार, यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद


सार्वजनिक स्वच्छतेसाठी 168 कोटी तरतूद

घनकचरा व्यवस्थपणासाठी 90 कोटी रुपयांची तरतूद

जुन्या साठलेल्या कचऱ्यावर योग्य तंत्रज्ञानाच्या अवलंब करून जमीन पूर्तता करण्यासठी 100 कोटींची तरतूद

मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावणायसाठी 230 कोटी


राणीच्या बागेसाठी 74 कोटी रुपयांची तरतूद

मगर आणि सुसर यांच्यासाठी अंडर वाॅडर प्रदर्शनीचे बांधकाम करण्यात येणार

आशियातील सर्वात मोठी आणि एकमेव प्रदर्शनी असणार


सार्वजनिक स्वच्छतेसाठी 168 कोटी तरतूद

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प मुंबई राबवला जाणार

ज्याअंतर्गत मुंबईत अधिकाधिक बांबू वृक्षारोपण करण्याचा पालिकेची विचार

पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडूप ते कन्नमवार नगरपर्यंत 178 कोटी रुपयांची तरतूद


आश्रय योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना 300 स्क्वेअर फुटांचे सेवा निवासस्थाने देण्यात येणार

या योजनेअंतर्गत 12 हजार निवासस्थाने घरांची निर्मिती होणार

यंदाच्या अर्थसंकल्पात 1 हजार कोटी रुपयांची तरतूद

इमारत परीक्षण खात्यासाठी 355.92 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे


मुंबई महापालिका मंडयांसाठी 105 कोटी तरतूद करण्यात आली आहे


मुंबई अग्निशमन दलाला 232 कोटींची तरतूद करण्यात आली आहे


विशेष रुग्णालयांसाठी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, सन 2027 पर्यंत मुंबईत कुष्ठरोग प्रसाराची साखळी खंडीत

करण्यासाठी दिशादर्शक आराखडा तयार करण्यात आलेला आहे

त्यानुसार, मुंबईतील सर्व आरोग्य केंद्रांच्या विभागात कुष्ठरोगाच्या शुन्य प्रसाराचे उद्दिष्ट गाठण्याकरिता विविध उपाययोजना

अवलंबिण्यात येणार आहेत


घन कचरा व्यवस्थापन: मोठे प्रकल्प

देवनार क्षेपणभूमी इथे कचऱ्यातून वीज निर्मितीचा प्रकल्पासाठी 90 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे

क्षेत्र वाहतूक नियंत्रण साठी 3200 कोटींची तरतूद

मागच्या वेळी ही रक्कम 2561.98 कोटी होती


स्वछता दूत आणि क्लीन अप मार्शल साठी अर्थशंकल्पात 68 कोटी तरतूद प्रस्तावित


मुंबई अर्थसंकल्पात या करण्यात आल्या तरतूदी

मिठी नदीच्या बांधकामासाठी 451.75 कोटी

मोठे नाले सफाईसाठी – 93 कोटी

छोटे नाले सफाईसाठी – 105 कोटी

मिठी नदीच्या सफाईसाठी – 45 कोटी

पर्जन्य जलवाहिण्यांच्या कामांसाठी – 45 कोटी


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानासाठी अंदाजे 23.46 कोटींची तरतूद

सन 2024-25 मध्ये, 6 अतिरिक्त पॉलिक्लिनीक व डायग्नॉस्टिक सेंटर्स आणि 54 “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना’ सुरु करण्याचे प्रस्तावित आहे

तसेच, फिजिओथेरपिस्ट आणि कान, नाक, घसा तज्ञांच्या सुविधा लवकरच सुरु करण्यात येणार आहेत


रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली 306 कोटी

मुंबई महानगरपालिकेच्या सायन, केईएम, नायर या रुग्णालयात IVF उपचार पद्धती सुरू होणार

110 कोटी रुपयांचे थ्री टेसला एमआरआय मशीन मुंबई महानगरपालिका खरेदी करणार


गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1 हजार 870 कोटी रुपयांची तरतूद

क्षेत्र वाहतूक नियंत्रणासाठी यंदाच्या अर्थशंकल्पात अंदाजे 3200 कोटी इतजी तरतूद करण्यात आली आहे

मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प (वर्सोवा ते दहिसर) साठी 2 हजार 960 कोटी रुपयांची तरतूद

मुंबईतील पूरजन्य परिस्थीवर नियंत्रण मिळवण्याकरता

पर्जन्य जलवाहिन्यांच्या विविध कामांकरता 1930 कोटी रुपयांची तरतूद


आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ५९ हजार ९५४ कोटी रुपयांची तरतूद

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात १०.५० टक्यांची वाढ

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर


माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

ईडीकडून झालेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली

उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर ठाण्यातील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली


महापालिकेचा संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी मुंबई महापालिकेचा सन 2024-25 चां महापालिकेचा संपूर्ण अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल यांना सकाळी 11.08 वाजता  सादर केला

यावेळी, अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू, सुधाकर शिंदे, अश्विनी भिडे आणि अश्विनी जोशी चार अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त, विविध खाते प्रमुख उपस्थित होते तसेच, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंगल उपस्थित होते


मुंबई महापालिका बजेट सादर करणे सुरू

महापालिका प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अश्विनी भिडे दाखल

आर्थिक वर्ष २०२४-२५ चा शैक्षणिक बजेट अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी महापालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर केला.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्पिय अंदाज महापालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर केला


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच उद्घाटन

उमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची उपस्थिती


माणगावात ठाकरेंकडून ड्रॅगन फ्रूटच्या शेतीची पाहणी

सुभाष देसाईच्या ड्रॅगन फ्रूट बागेत ठाकरेंचा फेरफटका


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे समन्स

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज पाचव्यांदा ईडीचे समन्स बजावण्यात आले आहे

आजही अरविंद केजरीवाल चौकशीला हजर राहणार नाहीत


निवासी डॉक्टर राज्यात 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार

मानधनवाढ, प्रलंबित भत्ते, वसतिगृहांची स्थिती याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने निर्णय घेतला आहे

या संपामध्ये राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर सहभागी होणार आहेत

संपामुळे रुग्णांची देखील गैरसोय होण्याची शक्यता आहे


मुंबईत बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचे मॅसेज

मुंबईतील सहा ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारे मेसेज मुंबईच्या वाहतूक पोलिसांना मिळाले आहेत

या मेसेजमुळं मुंबई पोलीस तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे


मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर होणार

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल हे महानगरपालिका सभागृहा अर्थसंकल्प आज

सकाळी 11 वाजता सादर करणार


वाशिमजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

खासगी बसची ट्रकला धडक

10 ते 15 प्रवासी गंभीर जखमी


भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात आज दुसरा कसोटी सामना

विशाखापट्टणमच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी आजपासून


महाविकास आघाडीची आज मुंबईत जागावाटपासंदर्भात बैठक

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही राहणार उपस्थित


मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 चा अर्थसंकल्प आज सादर केल्या जाणार

सलग दुसऱ्यांदा प्रशासकच करणार अर्थसंकल्प सादर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -