घरमहाराष्ट्रAmol Kolhe यांना आव्हान दिल्यानंतर अजित पवार सकाळीच शिरुर मतदारसंघ दौऱ्यावर; म्हणाले...

Amol Kolhe यांना आव्हान दिल्यानंतर अजित पवार सकाळीच शिरुर मतदारसंघ दौऱ्यावर; म्हणाले…

Subscribe

अजित पवार यांनी कोल्हेंची प्रतिक्रिया ऐकून न घेता, कोल्हे जे काही बोलले असतील ते त्यांना लखलाभ म्हणत मी जे बोललो तेच फायनल असं म्हटलं आहे.

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मंगळवारी शिरुर मतदार संघातील विकास कामांची भल्या पहाटे पाहणी केली. काल (सोमवार, 25 डिसेंबर) त्यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना हरवणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज लगेचच अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं आहे. (Maharashtra Politics After challenging Amol Kolhe Ajit Pawar toured Shirur constituency early in the morning )

अजित पवार यांनी कोल्हेंचं नाव न घेता त्यांना हरवणार असल्याचं म्हटलं, त्यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावर विचारलं असता. अजित पवार यांनी कोल्हेंची प्रतिक्रिया ऐकून न घेता, कोल्हे जे काही बोलले असतील ते त्यांना लखलाभ म्हणत मी जे बोललो तेच फायनल असं म्हटलं आहे.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले की, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि आज हा दौरा याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता ते म्हणाले की, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि या दौऱ्याचा संबंध नाही, हा दौरा पूर्वनियोजित होता. यावेळी अजित पवारांनी पुण्यातील हडपसरमध्ये मांजरी पुलाची पाहणी केली. तसंच, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना ती लखलाभ, मी काल जे सांगिलं तेच फायनल आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

कोल्हेंबाबत काय म्हणाले होते अजित पवार? 

अजित पवार म्हणाले की, मी हे कधीच बोलणार नव्हतो पण आता बोलतोय. निवडणुका जवळ आल्यात ना त्यामुळे आता त्यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कोणी पदयात्रा तर कोणाला संघर्षयात्रा सुचत आहेत. लोकशाही आहे, लोकशाहीत सर्वांनाच पदयात्रा काढण्याचा अधिकार आहे.  गेल्या पाच वर्षांत यांची काय भूमिका होती आणि गेल्या काळात तुम्ही त्या संबंधित खासदाराला कितीदा आपल्या मतदारसंघात पाहिलं आहे.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले की, उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती. ते वक्ते उत्तम आहेत, वर्त्कृत्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलं आहे. पण काळजी करू नका, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, मी निवडून आणून दाखवेन, असं अजित पवार म्हणाले.

(हेही वाचा: Thackeray on Modi Government: कुस्ती जिंकली, मस्ती जिरली! ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -