घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : विरोधीपक्ष नेत्याच्या निवडीला विलंब? नाना पटोलेंनी सांगितलं कारण

Maharashtra Politics : विरोधीपक्ष नेत्याच्या निवडीला विलंब? नाना पटोलेंनी सांगितलं कारण

Subscribe

Maharashtra Politics : राज्याच्या पावसाळी अधिवेशनला (Monsoon session) सुरूवात होऊन जवळपास आठवडा उलटला तरी विरोधकांकडून विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis government) सामील होण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाचा (Leader of Opposition in Legislative Assembly) राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. या गोष्टीलाही आता 20 दिवस उलटून गेले आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर त्याच्यासोबत काही आमदारही गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. परंतु अद्यापही विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. त्यामुळे चर्चेना उधाण आलं आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विरोधी पक्षेनेत पदाच्या निवडीला उशिरा होण्यामागचं कारण सांगितलं आहे. (Maharashtra Politics Delay in Election of Opposition Leader Nana Patole told the reason)

हेही वाचा – मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून…अमोल मिटकरींच्या ट्वीटची चर्चा

- Advertisement -

नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस महत्त्वाच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत सभागृहात काम करत आहे. दोन्ही सभागृहांत आता आमचाच विरोधी पक्षनेता होऊ शकतो. विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीमध्ये आमच्या हायकमांडने सहकारी पक्षाला विचारून निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या निवडीला वेळ लागत आहे. या आठवड्यात यावर नक्की निर्णय होईल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

हेही वाचा – ‘त्या’ कार्यालयाला नाव काय देणार? आदित्य ठाकरे यांचा भाजपाला खोचक सवाल

- Advertisement -

भाजपावर साधला निशाणा

दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भय आणि भ्रष्टाचार घेऊन भाजपा काम करत आहे. आमचे लोक भाजपमध्ये जातील असा दावा ते वारंवार करत आहेत. परंतु भाजपकडून फक्त पुड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी आम्ही केली. पण भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. जनतेने त्यांना सत्ता देऊन चूक केली आहे. भविष्यात तीन तिघाडा काम बिघाड होणारच आहे. यावेळी त्यांना शिंदे गटात अस्वस्थता आहे का? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, यावर आम्हाला मत मांडण्याची गरज नाही, असे बोलून नाना पटोले यांनी बोलणे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -