घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजेलमधून सुटून आला, पुन्हा घरफोडी करू लागला; साथीदार सोनारही जाळ्यात

जेलमधून सुटून आला, पुन्हा घरफोडी करू लागला; साथीदार सोनारही जाळ्यात

Subscribe

नाशिक : शहरात २५ हून अधिक घरफोड्या करणार्‍या सराईत चोरट्यासह चोरीचे सोने विकत घेणार्‍या नाशिकरोड येथील सराफ व्यावसायिकाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने सराफाकडून १८० ग्रॅम सोने व दोन किलो चांदी असा एकूण १२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने दोघांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चोरी करताना मदत करणार्‍या अजून एका चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

शंकर श्यामराव कापसे (वय २५, रा. गुलाबवाडी, मालधक्का रोड, नाशिकरोड) असे घरफोड्याचे नाव असून तुषार चंद्रकांत शहाणे (रा. नाशिकरोड) असे संशयित सराफी व्यावसायिकाचे नाव आहे. नाशिक शहरातील वाढत्या घरफोड्यांचे गुन्हे लक्षात घेता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखा पथके व स्थानिक पोलीस ठाण्यांना गुन्हे उघड करुन संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक समांतर तपास करत होते. सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांना रेकॉर्डवरील आरोपी शंकर कापसे हा कारागृहातून सुटून आला असून, त्याने घरफोड्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.

- Advertisement -

नुकताच सुटून आला होता 

शंकर कापसे हा याआधीही घरफोडीच्या गुन्ह्यात सापडला होता. त्याला न्यायालयाने कोठडी सुनावली होती. काही दिवसापूर्वीच तो कोठडीतून सुरून बाहेर आला होता. बाहेर येताच त्याने पुन्हा आपले जुनेच काम सुरू केले होते. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतल्यानंतर तब्बल २५ घरफोडीच्या घटनांची उकल त्याच्याकडून करण्यात आली आहे.

टक्केवारीसाठी सराफ घ्यायचा चोरीचे दागिने

कापसे चोरलेले सोने व चांदी सराफी व्यावसायिक तुषार शहाणे याला विक्री करायचा. दोघांनी संगनमताने टक्केवारी ठरवून घेतली होती. कापसे हा सराईत चोरटा असल्याचे माहिती असतानाही कापसेने त्याच्याकडून वेळोवेळी चोरीचे सोने विकत घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

- Advertisement -

इथे केल्या चोरया 

सराईत चोरट्याने आडगाव, पंचवटी, म्हसरुळ, आडगाव, इंदिरानगर, नाशिक रोड, मुंबईनाका परिसरात साथीदारांसह घरफोडी केल्याचे कबुल केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -