घरताज्या घडामोडीचिन्ह-नाव देताना शिंदे गटाला झुकतं माप; 12 मुद्द्यांच्या पत्रातून निवडणूक आयोगावर ठाकरे...

चिन्ह-नाव देताना शिंदे गटाला झुकतं माप; 12 मुद्द्यांच्या पत्रातून निवडणूक आयोगावर ठाकरे गटाचा आरोप

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिवाय याबाबत 12 मुद्द्यांचे पत्रही ठाकरे गटाने आयोगाला लिहिले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिवाय याबाबत 12 मुद्द्यांचे पत्रही ठाकरे गटाने आयोगाला लिहिले आहे. या पत्रात निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. याच निवडणूक आयोगानं चिन्हासंदर्भात जे निर्णय घेतले, त्या सर्व निर्णयांमध्ये उघडउघडपणे पक्षपातीपणा केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. (Maharashtra Politics Thackeray Group Allegation Of Shinde Group On In Letter To Election Commission)

उद्धव ठाकरे यांच्या गटाने आम्ही दिलेले चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाने जाणून-बुजून दुसऱ्या बाजूला कळतील, अशा पद्धतीने वेबसाईटवर टाकले, असा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यांच्या याच भूमिकेमुळं शिंदे गटाला आमची सगळी रणनिती कळल्याचेही ठाकरे गटाचे म्हणणे आहे. काही वेळापूर्वीच हे तक्रार पत्र ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगात सादर केले.

- Advertisement -

आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जे जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते? अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे वकिल विवेक सिंह यांनी हे पत्र निवडणूक आयोगाकडे सोपवले आहे. ठाकरे गटाला मशालचे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाला नेमके कोणते चिन्ह मिळणार याची उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला असून शिंदे गटाला म्हणजेच ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला पक्षाचे नाव व चिन्हाचे पर्याय देण्यास सांगितले होते. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या गटाने त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय निवडणुक आयोगाकडे पाठवला होता. तसेच, शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ गदा हा पर्याय दिला होता. मात्र, धार्मिक मुद्द्यावरुन निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची त्रिशुळ आणि गदा ही चिन्ह बाद केली. त्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिलं असून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्हाला मान्यता दिली. तसंच आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ व शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अशी नविन पक्षनावं दिली.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाटकातील हिजाबबंदी : सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता, प्रकरण सरन्यायाधीशांसमोर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -