घरमहाराष्ट्रMaharashtra Rain : राज्यातील 5 महत्त्वाच्या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट, तर काही...

Maharashtra Rain : राज्यातील 5 महत्त्वाच्या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो

Subscribe

Maharashtra Rain : राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने काही दिवस दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा जोर धरला आहे. मागील आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) महाराष्ट्राला (Maharashtra) झोडपून काढले आहे. राज्यातील काही भागात पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही. हवामान विभागाकडून (IMD) उद्याही राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उद्या पावसाचा आणखी जोर वाढणार असल्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. (Maharashtra Rain Red alert for 5 important districts of the state tomorrow orange and yellow for some districts)

हेही वाचा – Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस; 140 गावांचा संपर्क तुटला

- Advertisement -

गेल्या आठवड्याभरापासून राज्यात मुसळधार पाऊस जोरदार बरसत आहे. अशातच हवामान विभागाने उद्याही 24 तासांसाठी पालघर, ठाणे, पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोली या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. याशिवाय कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुसळधार पावसामुळे हवामान विभागाकडून उद्याही राज्यातील 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या निर्देशानुसार नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असणार आहे, तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर अतिशय कमी असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा – Irshalwadi : दुर्दैवाने मृतांचा आकडा तीन आकडी असू शकतो; गिरीश महाजन यांनी वर्तवली भीती

बुलढाणा, यवतमाळमध्ये पुरस्थिती

दरम्यान, आज सकाळपासूनच सुरू असलेलया मुसळधार पावसामुळे बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील नद्यांना पुर आला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून तेथील नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. बुलढाण्यातील सातपुड्याच्या (Satpura) पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर (Sangrampur) आणि जळगाव जामोद (Jalgaon Jamod) तालुक्यात आज सकाळपासूनच ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे सर्वच नदी ओढ्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच गेल्या काही वर्षात यवतमाळ शहरात पहिल्यांदाच अनेक भागात पाणी साचले आहे. शहरातील अनेक भागात पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -