घरताज्या घडामोडी'पंधरा वर्षापुर्वी येवल्यात आले असते तर फरक कळला असता'; भुजबळांचा आदित्य ठाकरेंना...

‘पंधरा वर्षापुर्वी येवल्यात आले असते तर फरक कळला असता’; भुजबळांचा आदित्य ठाकरेंना टोला

Subscribe

नाशिक : आदित्य ठाकरे नाशिक दौर्‍यावर येत आहेत आनंद आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष फिरत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे नाशिकला आले असतील. जर ते 15 वर्षांपूर्वी येवला मतदारसंघात आले असते तर त्यांना फरक कळला असता, असा उपरोधिक टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौर्‍यावर येत येवला येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. याबाबत भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, आदित्य ठाकरे येत आहेत, आनंद आहे. काळात निवडणुका असल्याने त्यानुसार प्रत्येक पक्ष फिरत आहे. तसेच अधिवेशनाला सुट्टी असल्याने अनेक जण बाहेर पडत आहेत. संभाजीनगरपर्यंत जात आहेत.जर आदित्य ठाकरे 15 वर्षांपूर्वी येवल्यात आले असते, तर फरक कळला असता, असा टोलाही भुजबळांनी यावेळी लगावला आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

- Advertisement -

कावनई’च्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या  

इगतपुरी येथील कावनई किल्ल्यावर दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. इगतपुरीतील वैतारणा, भातसा ही धरणे अद्याप 50 टक्के सुद्धा भरलेली नाहीत. मुंबईला या धरणातून पाणीपुरवठा केला जातो, दोन महिने उलटले तरी अद्यापही पाऊस फारसा झालेला दिसत नाही, तलाव भरलेले नाहीत. आपल्या जिल्ह्यात अनेक छोटे मोठे गडकिल्ले असून पावसाळ्यात सांभाळून गेले पाहिजे. पावसाचे आणि धबधब्यांची मजा घेण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात, मात्र दुर्घटना घडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी भुजबळ यांनी केले.

काझी गढीबाबत उपाययोजना करा 

तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी सप्तशृंगी वणी गडाजवळील मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळल्याची घटना घडली. यात एक भाविक जखमी झाल्याचे समजते. यावर ते म्हणाले की मार्कंडेय डोंगरावर अनेकदा गर्दी पाहायला मिळते. त्या दिवशीही गर्दी झाले हे चित्र होते, सुदैवाने काही घडले नाही, पण खबरदारी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच नाशिकच्या काझी गढीबाबत ते म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी काझी गढीचा काही भाग कोसळला होता, घर कधीही कोसळू शकतात. यासाठी मनपा प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे.” धोकादायक परिस्थिती असल्याने लवकरात लवकर उपाय योजना करण्याचे भुजबळांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -