घरमहाराष्ट्रIrshalwadi : दुर्दैवाने मृतांचा आकडा तीन आकडी असू शकतो; गिरीश महाजन यांनी वर्तवली...

Irshalwadi : दुर्दैवाने मृतांचा आकडा तीन आकडी असू शकतो; गिरीश महाजन यांनी वर्तवली भीती

Subscribe

Irshalwadi : रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या (Irshalgarh) पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी (Irshalwadi) येथे मुसळधार पावसामुळे डोंगराचा एक मोठा भाग कोसळून बुधवारी (19 जुलै) रात्री झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दरड कोसळली आणि या वाडीतील अनेक घर डोंगराखील गाडली गेली. आज दिसऱ्या दिवशीही याठिकाणी ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 26 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे, तर 100 पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. परंतु हा आकडा आणखी वाढण्याची भीती भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी वर्तविली आहे. ते जळगावात (Jalgaon) एका कार्यक्रमात बोलत होते. (Irshalwadi Unfortunately the death toll could be in three figures Fear predicted by Girish Mahajan)

हेही वाचा – इर्शाळवाडीसारख्या दुर्घघटना टाळण्याकरिता उद्धव ठाकरेंनी सुचविल्या उपाययोजना

- Advertisement -

जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित जी-20 युवा संवाद कार्यक्रमात गिरीश महाजन हे उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी इर्शाळवाडीच्या दुर्घटनेची आपबिती सांगितली. गिरीश महाजन म्हणाले की, ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पहाटे तीन वाजता घटनास्थळी पोहोचलो. वादळ आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्यात खूप अडथळे आले. सुरुवातीला काही लोकांना वाचवण्यात आम्हाला यश आले. पण ही दुर्घटना खूप मोठी आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत फक्त 22 ते 24 लोकांचे मृतदेह हाती आले असले तरी मृतांचा आकडा हा दुर्दैवाने तीन आकडी असू शकतो, अशी भीती गिरीश महाजन यांनी यावेली बोलताना वर्तवली. इर्शाळवाडी गावात अडीचशे कुटुंब वास्तव्याला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेनंतर आतापर्यंत शंभर ते सव्वाशे लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता गिरीश महाजन यावेळी  बोलताना वर्तविली.

हेही वाचा – इर्शाळवाडीतील ग्रामस्थांनचे पुनर्वसन करा, मुख्यमंत्र्यांच्या ‘सिडको’ला सूचना

- Advertisement -

अनाथ मुलांचं पालकत्व घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अनेक स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. याशिवाय इर्शाळवाडी दुर्घटनेत आई-वडील गमावलेल्या अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यास स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार दर्शवला आहे. पुण्याच्या भोई फाऊंडेशनने या दुर्घटनेत आई-वडील गमवलेल्या अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांचे संपूर्ण शिक्षण ही संस्था करणार असून प्रशासनाकडून या मुलांची यादी मागवली गेली आहे. एकीकडे शैक्षणिक पालकत्व या संस्थेने घेतले असून दुसरीकडे या संस्थेचे कार्यकर्तेही घटनास्थळी जाऊन फवारणीचं काम करत आहेत. याशिवाय डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सुद्धा 18 वर्षांपर्यंतच्या मुलाचे पालकत्व स्वीकारले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -