घरमहाराष्ट्रMaharashtra SSC result : इयत्ता १० वीच्या परीक्षांचा अंतिम निकाल आठवड्याभरात जाहीर...

Maharashtra SSC result : इयत्ता १० वीच्या परीक्षांचा अंतिम निकाल आठवड्याभरात जाहीर होण्याची शक्यता

Subscribe

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १० वीचा अंतिम निकाल येत्या आठवड्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रा बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइट पाहता येणार आहे. राज्यभरात सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाकडून निकालाची तयारी केली जात आहे. लवकरचं अंतिम निकालाची तारीख जाहीर केली जाईल.

यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम निकाल हे मूल्यांकन पद्धतीने जाहीर केले जातील. कोरोना महामारीमुळे यंदा माध्यमिक विद्यालय (SCC) परीक्षा रद्द झाली. राज्यातील शालेय शिक्षण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडा यांनी यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द करत मूल्यांकन पद्धतीनुसार निकाल जाहीर करत पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि ९ वीच्या अंतिम निकालांच्या आधारे पास केले जाणार आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -