घरमहाराष्ट्रMaharashtra Assembly winter session 2021: अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थित महाविकास आघाडीची खलबतं

Maharashtra Assembly winter session 2021: अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थित महाविकास आघाडीची खलबतं

Subscribe

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थित महाविकास आघाडी सरकारची बैठक होत आहे. या बैठकीत अधिवेशनात कशा पद्धतीने विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं याबाबत चर्चा होऊ शकते. विविध मुद्द्यांवर विरोधक महाविकास आघाडी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी नेते बैठकीला उपस्थित आहेत. अजित पवार यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिवेशनाच्या आधी सरकारची बैठक होणार असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीविषयी विचारलं तेव्हा मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम आहे, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असं स्पष्टपणे सांगितलं.

- Advertisement -

मुख्यमंत्री यांची तब्येत चांगली आहे. त्यांनी मला, थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील यांना बुधवारी ९ वाजता बैठक घ्यायला लावली आहे. मुख्यमंत्री कुठल्याही वेळी विधानभवनात येतील. मंगळवारी त्यांनी आम्हाला वर्षावर देखील बोलावलं होतं, असं अजित पवार यांनी सांगितलं.

शक्ती कायदा याच अधिवेशनात येणार – गृहमंत्री

अ‍ॅसीड हल्ला किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असलेला आणि त्यासाठी विशेष न्यायालयांच्या स्थापनेबाबतचा शक्ति कायदा अधिवेशनात येणार अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Assembly Winter Session 2021: शक्ती कायदा याच अधिवेशनात येणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -