घरमहाराष्ट्रतळीरामांनो, दारू पिण्यापूर्वी ही बातमी वाचा!!

तळीरामांनो, दारू पिण्यापूर्वी ही बातमी वाचा!!

Subscribe

तळीरामांनो दारू पिण्यापूर्वी तुमच्या खिशाला भुर्दंड तर बसणार नाही ना? याचा एकदा विचार करा.

चल, आज बसूया. मस्तपैकी एक एक पेग मारू. असं म्हणत अनेक जण एका पेगवरून दहा पेगवर जातात. पण, आता तळीरामांसाठी एक बॅड न्यूज आहे. कारण, राज्य सरकारनं विदेशी ब्रॅडच्या उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे आता दारू महागणार आहे. राज्य सरकारकडून विदेशी दारूच्या उत्पादन शुल्कात १८ ते २० टक्के वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये त्यामुळे ५०० कोटींची भर पडणार आहे. परिणामी, दारू पिणाऱ्यांना आता आपला खिसा हलका करावा लागणार आहे. राज्य सरकारला सध्या विविध योजनांसाठी पैशांची कमतरता जाणवत आहे. शिवाय, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग लागू केल्यानं आता सरकारी तिजोरीवर देखील ताण पडणार आहे. त्यामुळे उत्त्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं विदेशी दारूच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची आता चर्चा रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -