घरमहाराष्ट्रविष प्रयोगामुळेच दोन दिवसात २ वाघांचा मृत्यू

विष प्रयोगामुळेच दोन दिवसात २ वाघांचा मृत्यू

Subscribe

अभयारण्यात असलेल्या टी १६ म्हणजे चार्जर आणि टी ४ म्हणजे राई या दोन वाघांचा शिकारीच्या माध्यमातून झालेल्या विषप्रयोगामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

दोन दिवसामधअये दोन वाघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. उमरेड पवनी करांडला अभयारण्यात झालेला वाघांचा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचे समोर आले आहे. टी १६ नर वाघ आणि टी ४ वाघिणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणो वन्यप्रेमींनी वन विभागाला जबाबदार धरले आहे. तसंच दोषी वन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वन्य प्रेमींनी केली आहे.

वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

भंडाऱ्यातील उमरेड पवनी करांडला या अभयारण्याची जय वाघामुळे एक विशेष ओळख होती. मात्र जय वाघ अचानक गायब झाल्यामुळे वन्यप्रेम आणि जय वाघाच्या चाहत्यांमध्ये निराशा परसरली होती. मात्र त्यानंतर त्याची जागा त्याचा शावक जयचंद्र या वाघाने घेतली. मात्र गतकाळात हा वाघ देखील बेपत्ता झाला. त्यामुळे या अभयारण्यामध्ये बोटावर मोजण्या इतकेच वाघ होते. परंतू दोन दिवसात आणखी दोन वाघांचा मृत्यू झाल्यामुळे वन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

- Advertisement -

विष प्रयोगामुळे मृत्यू 

या अभयारण्यात असलेल्या टी १६ म्हणजे चार्जर आणि टी ४ म्हणजे राई या दोन वाघांचा शिकारीच्या माध्यमातून झालेल्या विषप्रयोगामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. आज या अभयारण्याकरिता दोन वाघांचा मृत होणो ही मोठी बाब आहे. या घटनेला वन विभागचं जबाबदार असल्याचा आरोप वन प्रेमींनी केला आहे. या घटनाप्रकरणात दोन्ही वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्राथमिक अंदाजानुसार विष पोटात गेल्यामुळे दोन्ही वाघांचा मृत्यू झालाचे समोर आले आहे. वाघाच्या बचावासाठी सरकारकडून प्रयत्न जरी केले जात असले तरी त्याच्या अवैधपणे होत असलेली शिकार देखील त्याला अपवाद आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

उमरेडच्या जंगलात आढळला आणखी एका वाघिणीचा मृतदेह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -