घरमहाराष्ट्रMaharashtra Unlock : दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृहे सुरु होणार, उपमुख्यमंत्र्यांचे संकेत

Maharashtra Unlock : दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृहे सुरु होणार, उपमुख्यमंत्र्यांचे संकेत

Subscribe

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने आता अनेक गोष्टी अनलॉक केल्या जात आहे. यात आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे (cinema Hall) सुरु होणार आहेत. याचपार्श्वभूमीवर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या नाट्यगृहची तिसरी घंटा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाजवण्य़ात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृहे सुरु होणार असे संकेत दिले आहे. यानिमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाट्यगृहे आणि सिनेमागृह लवकरचं पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा तसेच कलावतांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना अजित पवार ‘दिवाळीनंतर परिस्थिती अशीच राहिली किंवा यापेक्षा चांगली झाली तर नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवागनी देऊ. याशिवाय ६५ हजार कलावंतांची यादी आमच्या जवळ आली आहे. आणि काही कला पथकांची यादी आली आहे. कलावंतानांना फुल न फुलाची पाकळी म्हणून ५००० हजार रुपये दिले. तर कलापथकांना ५० ते ६० हजार रुपये देण्याचा विचार सुरु आहे. पण ते कलापथक किती मोठं आहे त्यानुसार निधी देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. असं ते म्हणाले.

- Advertisement -

 फिल्म सिटी मुंबईच रहावी यासाठी मविआ सरकारचा प्रयत्न

“तसेच गरीब कलावंतांच्याही अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर चित्रनगरीत, आणि मुंबई फिल्मसिटीमध्ये अनेक सुविधा देण्याचा मानस आहे. फिल्म सिटी सुरु झाल्यापासून संपूर्ण देशाचं केंद्र मुंबई राहिलेलं आहे, ते मुंबईच राहवं, महाराष्ट्राचं राहावं हीच सर्वांची इच्छा आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करेल.” असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.  कोल्हापूर आणि मुंबईतील चित्रपट सृष्टीत नवीन सुविधा देऊ, असंही अजित पवार म्हणाले.

बालगंधर्व रंगमंदिराच्या नूतनीकरणाबाबत मी महापौर आणि आयुक्तांना सूचना देणार आहे.  याबाबत दोन मतप्रवाह आहेत, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, नाट्यगृहाचे नूतनीकरण करताना कलाकारांचा विचार करायला हवा.  आधीच दीड वर्षे नाट्यगृहे बंद होती.  त्यात नूतनीकरणासाठी पुन्हा बालगंधर्व बंद ठेवावे लागल्यास कलाकार आणखी अडचणीत सापडतील, असं पवार म्हणाले.

- Advertisement -

तिसरी लाट येऊ नये यासाठी घबरदारी 

“मार्च २०२० पासून राज्यात सर्व नाट्यगृहं बंद होती, यावेळी नाट्यक्षेत्रातील मान्यवरांकडून सतत सर्व केव्हा सुरु होणार अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्र्यांकडे करायचे. मात्र आज ती वेळ आली आणि सर्व सुरु झाले. परंतु मराठी नाट्यक्षेत्रासंबंधीत अनेक प्रश्न, अडचणी आहेत. सध्या नाट्यगृहात एक सीट सोडून एक अशी बसण्याची सुविधा म्हणजे ५० टक्क्यांनी बसण्याची सुविधा देण्यात आली आहे. परंतु आज नाट्यगृह सुरु होत आहेत. शाळा, कॉलेजेस सुरु झाले आहेत. दिवाळी तोंडावर आली आहे. दिवाळीनंतर परिस्थितीचा अंदाज घेऊ. कोरोना रुग्णसंख्या कमी होतेय परिस्थिती सुधारतेय. मात्र असे असताना काही चुका होऊ तिसरी लाट येऊ नये यासाठी घबरदारी घ्य़ावी लागत आहे.” असंही उपमुख्यमंत्री म्हणाले.

“सरकारला सर्व काही बंद करणं आवडत नाही प्रत्येकालाच आपल्या अंगात असलेली कला-गुण दाखवण्याचा संधी दिली पाहिजे, कारण तो त्यांचा हक्क आहे अधिकार आहे. अशा परिस्थिती राज्यातील अनेक कलावंतांनी, निर्मित्यांनी, दिग्दर्शकांनी खूप काही सहन केलं. स्टेजवरचे कलाकार, बॅकस्टजचे कलाकार यांनीही खूपकाही सहन केलं. या कला कारांसाठी महामंडळ तयार करु यातून सकारात्मक प्रयत्न करु.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“देशामध्ये १०० कोटी लसीकरण झाले, जगात कुठल्या देशामध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात लसीकरण झाले नाही. आत्ता महाराष्ट्रातही पुणे, मुंबई सर्वाधिक लसीकरण कसं करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुळशी तालुक्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे. असंही उपमुख्यमंत्री म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -