घरमहाराष्ट्रनाशिकआकाशदिव्यांवर शिवप्रतिमा; बांबूंच्या कंदिलांनाही पसंती

आकाशदिव्यांवर शिवप्रतिमा; बांबूंच्या कंदिलांनाही पसंती

Subscribe

कोरोना संकट काळातील मरगळ दीपोत्सवात झटकली जाणार; किंमत स्थिर

नाशिक : कोरोना लाट जवळपास ओसरल्याने यंदाची दिवाळी आकाशकंदील निर्माते आणि विक्रेत्यांसाठीही गोड होणार आहे. मुख्य म्हणजे, यंदाही पर्यावरणपूरक आकाशकंदील खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे मागणीवरुन दिसून येत आहे. बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि बांबूपासून तयार केलेले आकशकंदील आकर्षण ठरत आहेत.

यंदा कोरोना ओसरल्याने आणि शासनाने निर्बंध शिथील केल्याने दिवाळीनिमित्त सजावट साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेमध्ये गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे उत्साह आणि चैतन्याचे वातावरण आहे. यंदाची दिवाळी चांगली करण्यासाठी आकाशकंदील निर्माते आणि विक्रेत्यांची लगबग सुरु आहे. बाजारपेठेत घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा, चांदणी, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले आकाशकंदील विक्रीस उपलब्ध झाले आहेत. तसेच, बांबूपासून तयार केलेले आकर्षक आकाशकंदीलही लक्ष वेधून घेत आहेत. ३५ रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंतचे कंदील बाजारात दिसून येत आहेत. छोटे-छोटे आकाशकंदीलही डझनप्रमाणे मिळत असून,
१० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत त्यांची किंमत सांगितली जात आहे.

- Advertisement -

 

आमच्याकडे पर्यावरणपूरक असे १०० प्रकारचे ३५ ते ६०० रुपयांपर्यंतचे आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सर्व आकाशकंदील पारंपरिक पद्धतीने रंगीबेरंगी तयार केलेले असून, चौरस, गोल, षटकोन अशा विविध आकारांतील आहेत.
– प्रशांत कदम, भगवती आर्ट्स

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -