घरदेश-विदेशशिवसेना-आघाडीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

शिवसेना-आघाडीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Subscribe

महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीत सहभागी झाली आहे. राज्याच्या राजकारणात होऊ घातलेल्या या महाआघाडी विरोधात गुरुवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ही आघाडी नैतिकतेला धरून नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एक नवी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या विरोधात हिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांनी याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रात भाजप व शिवसेना या पक्षांची निवडणूकपूर्व युती होती. हिंदुत्वाच्या मुद्यांवर या दोन्ही पक्षांनी मतदारांकडे मते मागितली.

- Advertisement -

या युतीला पूर्ण बहुमत मिळाल्याने त्यांनीच सत्ता स्थापन करणे आवश्यक असताना शिवसेनेने केवळ सत्ता मिळवण्यासाठी दुसर्‍या पक्षांसोबत जाण्याचा विचार सुरू केला आहे. हा प्रकार म्हणजे मतदारांशी द्रोह असल्याचा दावा प्रमोद जोशी यांनी केला आहे. शिवसेनेची ही भूमिका नैतिकतेला धरून नसल्याने या पक्षांच्या आघाडीच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात दाद मागितल्याचे जोशी यांनी सांगितले.

भाजपनेही बिहार व जम्मू-काश्मीरमध्येही याप्रकारे सत्ता स्थापन केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले, शिवसेना व भाजपने हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली होती. या राज्यांमध्ये भाजपने केलेली युती निवडणूकपूर्व नव्हती, असेही जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -