घरमहाराष्ट्रमालेगाव स्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी यांना सशस्त्र पोलीस सुरक्षा

मालेगाव स्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी यांना सशस्त्र पोलीस सुरक्षा

Subscribe

मालेगाव स्फोटातील आरोपी आणि सनातन या संस्थेचे सदस्य समीर कुलकर्णी यांना आजपासून महाराष्ट्र पोलिसांनी सशस्त्र पोलीस संरक्षण दिले आहे.

मालेगाव स्फोटातील आरोपी आणि सनातन या संस्थेचे सदस्य समीर कुलकर्णी यांना आजपासून महाराष्ट्र पोलिसांनी सशस्त्र पोलीस संरक्षण दिले आहे. केंद्रसरकरच्या म्हणण्यानुसार त्यांना हे पोलीस संरक्षण देण्यात आल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेश येथे तिवारी प्रकरण घडलं त्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले असून निशुल्क सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. ते सध्या जामिनावर बाहेर असून काही दिवसांपूर्वी ते कारागृहात होते.

नेमके काय घडले?

मालेगाव स्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी म्हणाले की, तीन जणानंतर सुरक्षा मिळाली, मला पोलीस संरक्षण मिळाले आहे. यात शंकराचार्य, साध्वी आणि कर्नल यांना सुरक्षा मिळाली होती.  कर्नल यांना मिलिटरी पोलीस, साध्वी यांना मध्यप्रदेश पोलीस आणि शंकराचार्य यांना युपी पोलिसांच संरक्षण होते, असे ही ते म्हणाले. सरकारी वकील यांना ही पोलीस संरक्षण होते. अन्य जे आरोपी होते मेजर उपाध्याय यांच्यावर उत्तर प्रदेश येथे हमला झाला होता. तर उत्तर प्रदेश येथे तिवारी प्रकरण घडलं त्याच्यानंतर केंद्रसरकरने ज्यांना आवश्यता आणि त्यांच्याकडे असलेल्या माहितीवरून आम्हाला सशस्त्र निशुल्क संरक्षण दिल आहे. हे संरक्षण महाराष्ट्र पोलीस यांनी दिल आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -