घरमहाराष्ट्रममत बॅनर्जी पोहचल्या थेट 'जलसा' वर; अमिताभ बच्चनला बांधली राखी

ममत बॅनर्जी पोहचल्या थेट ‘जलसा’ वर; अमिताभ बच्चनला बांधली राखी

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आज मुंबईत दाखल झाल्या आहेत. त्यांनी सर्वप्रथम जुहूस्थित अमिताभ बच्चन यांचे घर गाठले.

मुंबई : इंडियाच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांनी मुंबईत उतरताच थेट जुहूतील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे घर गाठले. जलसा या निवासस्थानी पोहचून त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना राखी बांधून रक्षाबंधण सण साजरा केला. यावेळी त्यांनी बच्चन कुटुंबियांचीही भेट घेतली.(Mamat Banerjee arrives live on ‘Jalsa’; Rakhi tied to Amitabh Bachchan)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आज मुंबईत दाखल झाल्या आहेत. त्यांनी सर्वप्रथम जुहूस्थित अमिताभ बच्चन यांचे घर गाठले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ममता बॅनर्जींना बच्चन कुटुंबियांनी त्यांच्या घरी चहासाठी आमंत्रित केले होते. ममता बॅनर्जींनीही ते निमंत्रण स्वीकारले आणि त्या अमिताभ बच्चन यांना राखी बांधायला गेल्या. त्यानंतर त्या थेट उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहचल्या असून, दोघांमध्ये काहीकाळ चर्चाही झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

आज मी आनंदी आहे म्हणत व्यक्त केल्या भावना

अमिताभ बच्चन यांची भेट घेऊन आणि त्यांना राखी बांधून बाहेर आलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मी आज खुश आहे. मी आज अमिताभ बच्चन यांना भेटले आणि त्यांना राखीही बांधली. मला त्यांचं कुटुंब खुप आवडलं. मी त्यांना दुर्गा पुजा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येण्यासाठी आमंत्रित केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : फुटीरांना राज्यातील जनता जागा दाखवून देईल; शरद पवार यांचा अजित पवार गटावर निशाणा

माझ्या हातात असते तर भारतरत्न दिला असता

राखी पौर्णिमेचा कार्यक्रम आटोपून अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर आलेल्या ममत बॅनर्जी यांनी मीडियाला सांगितले की, आमच्या यावेळी बऱ्याच गप्पा झाल्या. अमिताभ यांनी कोलकत्ता येथे आपल्या जीवनाला सुरूवात केली. आज अमिताभ बच्चन हेच आमच्यासाठी भारतरत्न आहेत. माझ्या हातात असतं तर मी एका क्षणात त्यांना भारतरत्न दिला असता असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

हेही वाचा : ‘इंडिया’च्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा होण्याची शक्यता-शरद पवार

बैठकीसाठी 11 राज्यांचे मुख्यमंत्री

इंडिया या विरोधकांच्या बैठकीला देशभरातील 11 राज्यांचे मुख्यमंत्री हजर झाले असून, अनेक विरोधी पक्षांचे नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली आहे. राज्यातील महाविकास आघाडीने या बैठकीचं आयोजन केलं असून भाजपला शह देण्यासाठी आता विरोधकांनी रणशिंग फुंकले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -