घरमहाराष्ट्रभाजपाच्या संपर्कात असलेले काँग्रेसचे ते १० आमदार कोण? 

भाजपाच्या संपर्कात असलेले काँग्रेसचे ते १० आमदार कोण? 

Subscribe

काँग्रेसचे जवळपास १० आमदार भाजपात येण्याच्या तयारीत असल्याचे विधान काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असतानाच आता पक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला असून, सध्या भाजपामध्ये येण्यासाठी अनेक काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार इच्छुक असून, काँग्रेसचे जवळपास १० आमदार भाजपात येण्याच्या तयारीत असल्याचे विधान काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. त्यामुळे भाजपामध्ये येण्यासाठी इच्छुक असलेले ते काँग्रेसचे दहा आमदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

काँग्रेसचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दहा आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत.

- Advertisement -

– अब्दुल सत्तार, काँग्रेसचे बंडखोर आमदार

विखे लावणार काँग्रेसला सुरुंग? 

दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या संपर्कात असून, ते लवकरच भाजपावासी होणार आहेत. मात्र ते स्वत:सोबत काँग्रेसच्या अनेक इच्छुक आमदारांना देखील सोबत घेऊन काँग्रेसला सुरुंग लावणार असल्याची माहिती सत्तार यांनी दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात झालेली काँग्रेसची वाताहात तसेच वाढत चाललेली भाजपा यामुळे काँग्रेसचे खासदार अस्वस्थ झाले असून, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे काय होणार, अशी चिंता काँग्रेसच्या अनेक खासदारांना लागली असून, यातील काही खासदार भाजपाच्या देखील संपर्कात असल्याचे समजत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

video : राष्ट्रवादीच्या महिलेला भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण

पुण्यात विहिंपच्या शोभायात्रेत मिरवल्या तलवारी, बंदुका; गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -