घरमहाराष्ट्रपुण्यात विहिंपच्या शोभायात्रेत मिरवल्या तलवारी, बंदुका; गुन्हा दाखल

पुण्यात विहिंपच्या शोभायात्रेत मिरवल्या तलवारी, बंदुका; गुन्हा दाखल

Subscribe

विश्व हिंदू परिषदेच्या २०० ते २५० कार्यकर्त्यांसह अध्यक्ष, जिल्हा कार्यध्यक्ष आणि जिल्हा मंत्री यांच्यावर निगडी पोलिसांत विनापरवाना शोभा यात्रेत शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या २०० ते २५० कार्यकर्त्यांसह अध्यक्ष, जिल्हा कार्यध्यक्ष आणि जिल्हा मंत्री यांच्यावर निगडी पोलिसांत विनापरवाना शोभा यात्रेत शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, रविवारी पिंपरी-चिंचवडमधील यमुनानगर परिसरात विश्वहिंदू परिषदेची शोभा यात्रा काढण्यात आली होती.

- Advertisement -

पाच मुलींच्या हातात तलवारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील यमुनानगर परिसरात २०० ते २५० कार्यकर्त्यांसह विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्यध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर हे देखील शोभा यात्रेत सहभागी झालेले होते. तेव्हा विनापरवाना कार्यकर्त्यांनी सोटे, भाले, तलवारी, दांडके, बंदुका हातात बाळगल्या. शिवाय चार मुलींच्या हातामध्ये एअर रायफल होती, ते हवेत चालवत असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. तर पाच मुलींच्या हातात तलवारी होत्या. त्या घेऊन शोभा यात्रेत मिरवत होत्या. याप्रकरणी निगडी पोलिसात २०० ते २५० कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांवर विनापरवाना हत्या बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -