घरदेश-विदेशMaratha Aarakshan : सुप्रीम कोर्टात १ सप्टेंबरपासून अंतिम सुनावणी

Maratha Aarakshan : सुप्रीम कोर्टात १ सप्टेंबरपासून अंतिम सुनावणी

Subscribe

मराठा आरक्षणप्ररकणी आज, २७ जुलैपासून सुप्रीम कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अंतिम आणि नियमित सुनावणीला सुरूवात झाली. आजच्या सुनावणीअंती या प्रकरणी आता १ सप्टेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरूवात होणार असल्याचे न्यायाधिशांनी सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य सरकारला नियुक्तीच्या मर्यादेपर्यंत स्थगिती म्हणून नियुक्त करता येऊ नये, अशा सूचना दिल्या. प्राथमिक मुद्द्यांबाबत उपस्थित असणाऱ्या अर्जावरील सुनावणीला २५ ऑगस्ट तसेच अंतिम सुनावणीला १ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. तसेच मराठा आरक्षण सुनावणीदरम्यान कोणातीही भरती केली जाणार नाही, असे कोर्टात सांगण्यात आले.

- Advertisement -

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तीन दिवसीय सुनावणीला सुरुवात झाली आहे. हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करा, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी निर्णय होणार आहे. जर तसा निर्णय झाला तर १ सप्टेंबरला ही सुनावणी होणार नाही, ती नव्या तारखेनुसार ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.

या सुनावणीवर विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आज कोर्टाने कोणतीही हस्तक्षेप याचिका स्वीकारलेली नाही. कोर्टाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. राज्य सरकारकडून कोणतीही भरती केलेली नाही. कोरोना आटोक्यात येत नाही, तोपर्यंत भरती केली जाणार नाही, असे राज्याने परिपत्रक काढले आहे. कोर्टाने प्रवेश प्रक्रियेवर स्थगिती दिलेली नाही. हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही हे 25 ऑगस्टला ठरणार आहे. जर तसा निर्णय झाला, तर १ सप्टेंबरला ही सुनावणी होणार नाही, ती पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होईल, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -