घरताज्या घडामोडीहे बेईमानीने निवडून आलेलं सरकार - देवेंद्र फडणवीस

हे बेईमानीने निवडून आलेलं सरकार – देवेंद्र फडणवीस

Subscribe

राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपनं सातत्यानं महाविकासआघाडीच्या सरकारवर टीका केलेली आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे राहिलं आहे. मुंबईत आज सुरू असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि सरकारच्या कोरोनासंदर्भातल्या धोरणांवर टीका केली आहे. त्यासोबतच सरकारवर निशाणा साधला आहे. ‘जनतेनं भाजपला निवडून दिलं आणि भाजपसोपबतच्या पक्षाला निवडून दिलं आहे. हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे. त्यामुळे कृपया जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे असं कृपया म्हणू नका. पण राजकारणात मागे वळून पाहायचं नसतं’, असं फडणवीस यावेळी म्हणाले. ‘या कोरोनाच्या संकटात जर कुठे तुमचं चुकत असेल, तर अशा ठिकाणी ती चूक दाखवून देणं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही ते दाखवून देत आहोत. देशात सर्वाधित रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. त्याचा आपण कुठे विचार करणार आहोत का?’, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

कोरोना संकटात आम्ही सरकारसोबत, पण…

‘देशात टेस्टिंगच्या बाबतीत आपण १९व्या क्रमांकावर आहोत. मुंबईचा मृत्यूदर ५.५ टक्क्यांवर आहे. पण मुंबईत टेस्ट होत नाहीत. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत, त्या ठिकाणी मी आणि प्रवीण दरेकरांनी भेटी दिल्या. पण त्या ठिकाणी ज्या वेगाने काम होणं गरजेचं आहे, त्या वेगाने होत नाही. क्वारंटाईन सेंटरमध्येच आमच्या महिला सुरक्षित नाहीत. महिलांवर अतिप्रसंगाच्या घटना घडत आहेत. त्यामुळेच या सेंटरमध्ये महिलांच्या संदर्भातली एसओपी राज्य सरकारने तयार करावी अशी आमची अपेक्षा आहे. कोरोनाच्या संकटात आम्ही सरकारच्या सोबत आहोत. पण ही लपवालपवी थांबवा. कोरोनाच्या संदर्भात प्रभावी पावलं उचलली गेली पाहिजेत’, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘कोरोनासोबतच आमच्या शेतकऱ्यांवर देखील संकट आलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी आपण आहोत असं त्याला वाटतंय का? हे तरी सरकारने पाहायला हवं. केंद्र सरकारने कापूस खरेदी, तूर खरेदी, मका खरेदी अशा प्रत्येक गोष्टीसाठी पैसा दिला. पण राज्यातल्या नाकर्त्या सरकारला ती खरेदी करता आलेली नाही. कर्जमाफी नाही, नवं कर्ज नाही आणि मागच्या हंगामाच्या उत्पादनाची खरेदी देखील नाही’, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून देखील राज्य सरकारवर तोफ डागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -