घरमहाराष्ट्रMaratha Reservation : योग्य निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू, जरांगे पाटलांनी...; फडणवीसांनी केले...

Maratha Reservation : योग्य निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू, जरांगे पाटलांनी…; फडणवीसांनी केले आवाहन

Subscribe

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बुधवारी (25 ऑक्टोबर) आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. आमरण उपोषण करताना जरांगे पाटलांनी अन्न, पाणी आणि त्यासोबतच औषधोपचारांचाही त्याग केला आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजही आक्रमक झाला आहे. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांना आवाहन केले आहे. (Maratha Reservation Efforts to take proper decision Jarange Patil Devendra Fadnavis appealed)

हेही वाचा – मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, तरीही उपोषण मागे न घेण्याचा ठाम निर्धार

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम त्यांच्या सोबत आहे. त्यांचा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जरांगे पाटलांसोबत असणाऱ्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मराठा आरक्षणामध्ये लक्ष घातलं आहे. जो काही योग्य निर्णय असेल, तो घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मला वाटतं मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

फक्त एकदाच चर्चा होणार

दरम्यान, जरांगे पाटील आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, तुम्ही चर्चेला या, मराठे तुम्हाला अडवणार नाही. पण फक्त एकदाच चर्चा होणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. एवढेच नाही तर जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी त्यांनी यायला पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही. आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की, नाही हे एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही. सरकारकडे आता दोनच पर्याय उरले आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांशी सामना तरा, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – मराठा समाजाच्या भावना तीव्र, आरक्षणाच्या आंदोलनाला…; राजीनामा देताना शिंदे गटाचे खासदार काय म्हणाले?

जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

पुन्हा आंदोलनाला बसलेल्या जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. पाच दिवसांनंतर आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांचा हात थरथरत होता. त्यामुळे बोलताना जरांगे पाटील यांच्या हातातून माईकही खाली पडला. त्यामुळे मराठा समाजाकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारशी चर्चा करून जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबत सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -