घरमहाराष्ट्र'महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांना गावी जाण्यास आरोग्य प्रमाणपत्राची गरज नाही'

‘महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांना गावी जाण्यास आरोग्य प्रमाणपत्राची गरज नाही’

Subscribe

फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला यावेळी आरोग्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले

महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांना आता डॉक्टरांकडून आरोग्य प्रमाणपत्राची गरज नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी स्पष्ट केले आहे. फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान “आम्ही हे असे ठरवले आहे की, यापुर्वी महाराष्ट्रात जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना त्यांच्या परराज्यातील गावी जायचं असेल तर डॉक्टरकडून आरोग्य प्रमाणपत्र घेणं गरजेचं होतं. त्यासाठी गावाला जाण्याआधी मजुरांना डॉक्टरच्या दवाखान्याबाहेर रांग लावावी लागायची, मात्र हे टाळण्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. ”

- Advertisement -

प्रवासाआधी मजुरांचे स्कॅनिंग करण्यात येईल

तसेच ज्या मजुरांना गावी जायचं आहे त्यांना आता या प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही. ज्या मजुरांना गावी जायचं आहे त्यांचे स्कॅनिंग करण्यात येईल. ताप नसलेल्या मजुरांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले. स्थलांतरित मजुरांसंदर्भात बोलत असताना त्यांनी परराज्यात आपल्या मायदेशी परतणाऱ्या मजुरांसाठी रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करायची आहे असे देखील सांगितले, तसेच रेल्वे कमी पडल्यात तर बसनेही परप्रांतीय मजुरांना बाहेर पाठवण्यात येईल. असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

नियमांचे पालन करणे आवश्यक

यासह राजेश टोपे यांनी असे ही सांगितले की, ”आपल्याला संसर्ग टाळायचा आहे. त्यादृष्टीने जे काही नियम तयार करण्यात येतील त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक आवश्यक आणि गरजेप्रमाणे घेण्याचे निर्णय आहेत त्याचं काम आपण तत्परतेने करण्यात आले आहे.”


मजुरांची अवस्था म्हणजे ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -