ऋषी कपूर रणबीरला म्हणायचे, आलिया नको तर ‘या’ व्यक्तीसोबत कर लग्न!

Not Alia Bhatt, Rishi Kapoor wanted son Ranbir Kapoor to marry THIS person!
ऋषी कपूर रणबीरला म्हणायचे, आलिया नको तर 'या' व्यक्तीसोबत कर लग्न!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत आणि दोघेही बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी हे दोघ लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. रणबीरचे वडील ऋषी कपूर यांना त्याचे लग्न आलियासोबत नसून इतर कोणाशी करायचे होते? आणि हे खरे आहे.

ऋषी कपूर यांनी २०१८ मध्ये आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रणबीर कपूर आणि त्याचा सर्वात चांगला मित्र आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी या दोघांचा फोटो शेअर केला होता आणि दोघांनी लग्न करावे असे सांगितले होते.

रणबीर आणि अयान हे खूप चांगले मित्र आहेत. या दोघांनी पहिल्यांदा ‘वेक अप सिड’ या चित्रपटात काम केले होते. रणबीर आणि अयान बऱ्याचदा व्हेकेशन एन्जॉय करताना दिसतात. आता या दोघांसोबत आलिया भट्टही दिसत आहे.

नवीन वर्षाची सुरुवात रणबीरने अयना आणि अलियानेसोबत केली होती. तिघांचा एन्जॉय करताना फोटो त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जेव्हा ऋषी कपूर कॅन्सरच्या उपचारकरिता न्यूयॉर्कला गेले तेव्हा रणबीरला आलिया आणि अयानने पाठिंबा दिला. त्यांच्या निधन झाल्यानंतर ही आलिया आणि अयान रणबीरच्या कुटुंबियांसोबत दिसले

रणबीर आणि आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम करणार होते. या चित्रपटाने दिग्दर्शन रणबीरचा चांगला मित्र अयान करत आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलियासह अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी, डिंपल कपाडिया आणि मोनी रॉय दिसणार आहे. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२० प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा – मराठीतला भाई करणार भाईजानबरोबर स्क्रीन शेअर, आता नवीन पॅटर्न ठरणार!