घरमहाराष्ट्रचांदिवलीत MIM चं लाव रे तो व्हिडिओ! मुस्लिम आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांच्या दाखवल्या...

चांदिवलीत MIM चं लाव रे तो व्हिडिओ! मुस्लिम आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांच्या दाखवल्या जुन्या प्रतिक्रिया

Subscribe

मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी एमआयएमने औरंगाबाद ते मुंबई तिरंगा रॅली काढली. मुंबईत चांदिवली येथे एमआयएमने जाहीर सभा घेत मुस्लिम आरक्षणावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीसह इतर पक्ष आणि नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी एमआयएमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानुसार लाव रे तो व्हिडिओ म्हणत मुस्लिम आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांच्या दाखवल्या जुन्या प्रतिक्रिया दाखवल्या.

मुस्लिमांना आरक्षण न मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, कांग्रेस, समाजवादी पार्टी जबाबदार आहेत. तसंच, या पक्षातील मुस्लिम नेत्यांनी केवळ मतांसाठी मुस्लिमांच्या भावनांशी खेळले, असा आरोप व्हिडिओच्या माध्यमातून केला. काँग्रेस नेते आरिफ नसीम खान, आमिन पटेल, सपाचे आमदार अबु आझमी यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या. ज्यामध्ये आमिन पटेल यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही तर अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा देत असल्याचा व्हिडिओ दाखवला. आरिफ नसीम खान यांचा देखील व्हिडिओ दाखवला. शिवसेना नेते सुनील प्रभु यांचा देखील व्हिडिओ दाखवला. तसंच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही व्हिडिओ दाखवण्यात आला.

- Advertisement -

काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात मागणी करतानाचा व्हिडिओ एमआयएमने दाखवला. माणिकराव ठाकरे यांचा मुस्लिम आरक्षणासंदर्भात माध्यमांवर प्रतिक्रिया देतानाचा व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा देखील व्हिडिओ चालवण्यात आला. यामध्ये राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना देखील सोडण्यात आलं नाही. त्यांची देखील मुस्लिम आरक्षमासंदर्भातील भूमिकेचा व्हिडिओ दाखवण्यात आला. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा देखील व्हिडिओ दाखवण्यात आला. या सर्व प्रतिक्रिया हे सर्व नेते सरकारमध्ये नव्हेत तेव्हाच्या दाखवण्यात आल्या.

यानंतर हे सर्व नेते जेव्हा सरकारमध्ये आले तेव्हा एमआयएमचे आमदार अम्तियाज जलील यांचा अधिवेशनात मुस्लिम आरक्षणासाठीची मागणी करत असतानाचा देखील व्हिडिओ याच दाखवण्यात आला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -