घरमहाराष्ट्रगाऱ्यात फिरणं वेगळं अन् चॉकलेट खाणं...; सत्तारांचा आदित्य ठाकरेंना टोला

गाऱ्यात फिरणं वेगळं अन् चॉकलेट खाणं…; सत्तारांचा आदित्य ठाकरेंना टोला

Subscribe

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि दिलासा द्यावा, अशी मागणीही विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची माहिती घेतली आहे. यावरून बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांचे पुत्र आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनीही बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले. कुठे गेले राज्याचे कृषीमंत्री? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी सत्तारांना डिवचले. ज्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

ज्याला बाण समजते त्याला बांध समजले, त्यांनी स्वत:चा बाण सुरक्षित ठेवला नाही. ते बांध कसा ठेवू शकतात? असा सवाल करत सत्तारांनी, मला वाटते घरात चॉकलेट खाणं वेगळं, काम्प्युटरवर बसणं वेगळं आणि जमिनीवर किंवा गाऱ्यावर फिरणं वेगळं आहे. असा टोला लगावला.

उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले, त्यांचे अडीच तासांचे नियोजन होते, त्यात 24 मिनिटे पाहणी केली, काय 24 मिनिटांत महाराष्ट्राची पाहणी करु शकतात. म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावे बाण कोणते आहे. काम कोणते आहे आणि बांध कुठे आहे, असा खोचक टोलाही सत्तारांनी लगावला आहे.

- Advertisement -

समृद्धीच काम व्यवस्थित नाही झालेले, मज्जामस्तीमध्ये सगळं चाललं आहे, शेतकरी बांधवांचा धीर सुटत चालला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी बांधव कायम आपल्या मागे उभा असतो त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामागे उभे राहावे लागेल. खाते वाटप होणार, बंगले वाटप होणार पण समस्या सुटणार आहे का, अशी विचारणा करत आदित्य ठाकरेंनी बांधावर आल्यावर कळत की शेतकऱ्यांची दु:ख काय आहे, म्हणत शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली होती.


मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाऊंट हॅक; मुंबईकरांना केले ‘हे’ आवाहन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -