घरमनोरंजन'अहमाद खान' यांना करायचं मराठीत काम

‘अहमाद खान’ यांना करायचं मराठीत काम

Subscribe

अॅक्शन सोबतच इमोशन आणि त्याच्या जोडीला ठसकेबाज संवादांनी भरलेला रॉकी हा चित्रपट येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात 'अहमाद खान' यांनी काम केलं असून त्याला मराठी चित्रपटात काम करायचं असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत बदल होत आहे. दमदार कथा, उत्तम दिग्दर्शन, उत्कृष्ट कलाकारांच्या जोरावर अनेक निर्माते मराठी चित्रपटसृष्टीत बदल करण्याचे धाडस दाखवत आहेत. केवळ तरूणांना नाही तर प्रत्येक पिढीला आपलेसे वाटेल असे चित्रपटसध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यातलाच एक नव्याने या फळीत दाखवणार ‘रॉकी’ हा चित्रपट. मराठीतील पहिला दमदार अक्शनपट असही आपण म्हणू शकतो. कारण या आधी अशा अक्शन आपण फक्त हिंदी चित्रपटातून बघत आलो आहोत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी खास आकर्षण ठरले दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक अहमद खानचे. केवळ एक मराठी चित्रपट नाही तर यापुढे अनेक मराठी चित्रपटांचा भाग व्हायला आवडेल अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

हे नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार

उत्तम कथा, भरपूर अऍक्शन आणि रोमान्सचे उत्तम समीकरण असणाऱ्या रॉकी या चित्रपटातून संदीप साळवे आणि अक्षया हिंदळकर हे दोन नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत हिंदी सिनेमांमधून झळकलेला चेहरा म्हणजे अभिनेते राहुल देव या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्याचबरोबर अभिनेते अशोक शिंदे, यतीन कारेकर, क्रांती रेडकर, विनीत शर्मा, दिप्ती भागवत, स्वप्नील राजशेखर अशी कलाकारांची फौजच या चित्रपटात आहे. रॉकी या चित्रपटाची निर्मीती मनेश देसाई, नितीन शिलकर, प्रशांत त्रिपाठी, हिमांशू अशर यांनी केली आहे. तर छायांकन फारूख खान यांचे आहे. तर समीर सप्तीस्कर, वासीम सदानी यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

- Advertisement -

हे आहे ट्रेलरमध्ये

चित्रपटाचा ट्रेलर हा अक्शनने भरलेला आहे. साधारण कथेत नाविण्य नसलं तरी ती मांडण्याची पद्धत वेगळी आहे. चित्रपटाचा नायक आधी एक साधा सरळ मुलगा असताना त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडते आणि त्याच संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. सध्या सरळ मुलाचं रूप एका बदला घेण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या मुलामध्ये रूपांतर होतं. मध्यमवर्गीय घरात वाढलेला हा मुलगा बदला घेण्यासाठी काय काय करतो हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळणार आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अदनान शेख यांनी केलं आहे. त्यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाविषयी सांगताना अदनान म्हणाले, ‘या आधी मी बागी २ या चित्रपटाला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. बागी सारखे अक्शनने भरलेले चित्रपट मराठीतही असावे असं मला कायम वाटायचं. माझ्या डोक्यात गेले अनेक दिवस या चित्रपटाची कथा होती. अनेकांनी मला हिंदीत चित्रपट करण्याचा सल्लाही दिला आहे. कथा पुर्ण लिहून झाल्यावर हा चित्रपट मराठीत करायचा असं मी ठरवलं. चित्रपटपूर्ण करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी मला मदत केली. मला खात्री आहे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल.’

- Advertisement -

तर मला मराठी चित्रपटाचा एक छोटासा भाग होता आलं हे मी माझं भाग्य समजतो. यापुढे मराठी चित्रपटांसाठी काम करायला नक्की आवडेल. एखादा हिंदी चित्रपट बघत असल्याचा भास त्यांना होईल. मराठीत झालेला हा बदल ते नक्की स्विकारतील.  – अहमद खान, नृत्यदिग्दर्शक


वाचा – ‘तुला पाहते रे’ : विक्रांत तर व्हिलन निघाला?

वाचा – ‘ब्रेकअप के बाद’ अभिनेत्रीची आत्महत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -