घरमहाराष्ट्रMira Road Crime : दोन गटांत हाणामारी, 15 अटकेत,फडणवीसांनी दिला इशारा

Mira Road Crime : दोन गटांत हाणामारी, 15 अटकेत,फडणवीसांनी दिला इशारा

Subscribe

संपूर्ण देश राम जन्मभूमी अयोध्या येथे श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या आनंदात असताना मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत गीता नगरमध्ये मात्र एक अनुचित घटना घडली.

मुंबई : मीरा रोड भागातील नया नगर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या दोन गटांतील हाणामारी प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत कायदा व सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांना खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. (Mira Road Crime Clash between two groups 15 arrested Fadnavis gave warning)

संपूर्ण देश राम जन्मभूमी अयोध्या येथे श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या आनंदात असताना मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत गीता नगरमध्ये मात्र एक अनुचित घटना घडली. धार्मिक घोषणाबाजी करत रॅली काढणाऱ्या आठ गाड्यांवर तेथील स्थानिक अन्य धर्मातील लोकांनी त्या रॅलीवर हल्ला केला. यामध्ये आठ गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये एक लहान मुलीसह, तीन महिला आणि चार पुरुषांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात दंगा भडकविणे व प्राणघातक हल्ला करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

तगडा पोलीस बंदोबस्त तैनात

दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात स्थानिक पोलिसांनी 15 जणांना अटक केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नया नगर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच बॅरिकेडिंगच्या माध्यमातून पोलीस प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवून आहेत. सध्या मीरा रोड परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

आमदार नितेश राणेंचं ट्वीट चर्चेत

मीरा रोड भागात घडलेल्या घटनेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X पूर्वीचे ट्वीटरवर पोस्ट करत फक्त उद्या मीरा रोड.. भेटू मग.. जय श्री राम अशी पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टवर उलट-सुलट चर्चा होत आहे. दरम्यान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेऊन, नया नगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करण्याची आणि सर्व आरोपींना 48 तासांत अटक करण्याची मागणी केली आहे. मिरा भाईंदर शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा कुणाचा तरी प्रयत्न असल्याचा सरनाईकांचा आरोप आहे. या प्रकरणातल्या आरोपींनी वेळेत अटक झाली नाही तर सरनाईकांनी 25 जानेवारीला मिरा भाईंदर बंदची हाक दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -