घरमहाराष्ट्रMLA Disqualification Case : उद्धव ठाकरेंचे 'ते' आरोप राहुल नार्वेकरांनी खोडून काढले

MLA Disqualification Case : उद्धव ठाकरेंचे ‘ते’ आरोप राहुल नार्वेकरांनी खोडून काढले

Subscribe

मुंबई : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षांबाबत दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला आहे. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांनी लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी आमच्या विरोधात निकाल दिल्याचा आरोप केला आहे. तर राहुल नार्वेकर यांनी हे आरोप स्पष्टपणे खोडून काढत, मी संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारच निकाल दिला आहे. जर माझा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असता तर सर्वोच्च न्यायालयाने लगेचच माझ्या निकालाविरोधात आदेश दिला असता. पण तसे झालेले नाही, असे स्पष्ट केले आहे. (MLA Disqualification Case Uddhav Thackerays those allegations refuted by Rahul Narwekar)

हेही वाचा – Uddhav Thackeray : सारे काही उमेदवारीसाठी; शिवसेनाप्रकरणी ठाकरेंचे नार्वेकरांवर गंभीर आरोप

- Advertisement -

विधानसभाध्यक्षांनी दिलेला निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात वाटत नाही का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. त्यावरून आता आरोप -प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव  ठाकरे यांनी तर नार्वेकर यांच्यावर थेट आरोप करताना म्हटले आहे, तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवत माझ्या शिवसेनेच्या विरोधात निकाल द्यायला लावला. त्यावर नार्वेकर यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे.

राहुल नार्वेकर म्हणाले की, जर सर्वोच्च न्यायालयाला हे पटवून देण्यात आले असते की माझा निकाल त्यांच्या निर्देशांविरोधात देण्यात आला तर न्यायालयाने माझ्या निकालाविरोधात लगेचच आदेश दिला असता. पण न्यायालयाच्या संपूर्ण निकालाला समजून घ्यायचे नाही केवळ एकच ओळ पकडून बोलायचे हे योग्य नाही. मी दिलेला निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच आहे. संविधान, पक्षातील संघटनात्मक रचना आणि विधिमंडळातील बहुमत बघायला सांगितले गेले होते. पक्षाच्या  घटनेत स्पष्टता नव्हती. अध्यक्ष म्हणून मी दिलेला निर्णय चुकीचा आहे असे कोणी म्हणाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Supriya Sule : सिलिंडरच्या दरात कपात म्हणजे मोदी सरकारचा जुमला, सुप्रिया सुळेंची टीका

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

धाराशिवच्या कळंब येथील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राहुल नार्वेकर लबाड आहेत. आता भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे लालच दाखवून माझ्या शिवसेनेच्या विरोधात निकाल द्यायला लावलात, हा माझा आरोप आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलं आहे की, त्यांनी म्हणजे त्या लवाद्याने जो निकाल दिलेला आहे, तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात वाटत नाही का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -