घरमहाराष्ट्रआमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात, गोरे यांच्यासह चौघे जखमी

आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात, गोरे यांच्यासह चौघे जखमी

Subscribe

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे गोरे यांची कार अंदाजे 30 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेतून सुर्दैवाने जयकुमार गोरे थोडक्यात बचावले आहे. मात्र त्यांच्यासह चार जण जखमी झाले आहे. या सर्वांवर आता पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सातारा येथील फलटणच्या मलठण येथे पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी हा भीषण अपघात झाला आहे.

गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्याला किरकोळ मार लागला आहे. मात्र इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. गोरे यांची गाडी पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ पुलावरून जात होती, यावेळी चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी खोल 30 फूट दरीत कोसळली. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला.

- Advertisement -

या गाडीतून गोरे यांच्यासह एकूण 4 जण प्रवास करत होते. यातील गोरे आणि त्यांच्या सहकार्याला किरकोळ मार लागला आहे. मात्र दोघांची प्रकृती गंभीर आहे. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या सुरक्षारक्षकावर फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

जयकुमार गोरे साताऱ्यातील माण खटावमधील आमदार आहेत. ते आपल्या मतदार संघात जात असताना काळोखामुळे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याचे सांगितले जाते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला आहे.


२४ तासांत ठाकरे पितापुत्र अडचणीत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -