घरताज्या घडामोडीMLC Election Result 2021: नागपूरसह अकोला विधानपरिषद निवडणुकीचा आज निकाल, भाजप-शिवसेना-काँग्रेस कोण...

MLC Election Result 2021: नागपूरसह अकोला विधानपरिषद निवडणुकीचा आज निकाल, भाजप-शिवसेना-काँग्रेस कोण बाजी मारणार?

Subscribe

राज्यातील विधानपरिषदेच्या दोन जागांवर १० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली होती. विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलढाणा या जागांवरील मतमोजणी होणार आहे. भाजप-शिवसेना आणि काँग्रेसची या जागांवर प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नागपूरमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यातील लढत चुरशीची ठरली आहे. भाजप आपला गड राखण्यात यशस्वी होईल की काँग्रेसचा विजय होईल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर अकोला वाशिम बुलढाण्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ६ जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यापैकी कोल्हापूर, मुंबई नंदूरबार या ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर नागपूर आणि अकोल्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २ जागांवर प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज होत आहे. आजच्या निकालानंतर कोणत्या उमेदवाराला विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळेल हे स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

नागपूरमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला

नागपूरमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बावनकुळे यांच्या विरोधात काँग्रेसचे अपक्ष उमेदवार मंगेश कदम निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या छोटू भोयर यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु ऐनवेळी काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मंगेश कदम यांना पाठिंबा दिला आहे. नागपूरमध्ये भाजपचे चांगले वर्चस्व असल्याने ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरत आहे. तर काँग्रेसची कामगिरी चांगली असल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असेही सांगण्यात येत आहे.

अकोल्यात शिवसेना बाजी मारणार?

विधानपरिषदेच्या अकोला वाशिम बुलढाणा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर निवडणूक घेण्यात आली होती. शिवसेनेकडून गोपिकीशन बाजोरिया तर भाजपकडून वसंत खंडेलवाल यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेला चांगला जनाधार असल्यामुळे गोपिकीशन बाजोरिया यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु भाजपकडून टक्कर देण्यात आली आहे. बाजोरिया यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वर्चस्व असल्यामुळे विजय त्यांचाच होईल असे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र दोन्ही नेत्यांकडे स्पष्ट बहुमत नव्हते यामुळे कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पत्नीच्या शिरच्छेदामागे संशयाचे भूत, माथेरानमधील हत्येचा गुन्हा २४ तासात उघड


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -