घरमहाराष्ट्रमनसेचा आज नवी मुंबईत वर्धापन दिन सोहळा

मनसेचा आज नवी मुंबईत वर्धापन दिन सोहळा

Subscribe

शॅडो कॅबिनेटची होणार घोषणा

नुकत्याच झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या शॅडो कबिनेटची घोषणा केली होती. ही शॅडो कॅबिनेट नेमकी असणार तरी कशी? याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. मात्र आता सोमवारी म्हणजेच मनसेच्या १४ वर्धापन दिनी, नवी मुंबई येथे साजरा होत असताना मनसेची ही शॅडो कॅबिनेट जाहीर होणार असून, या शॅडो कॅबिनेटमध्ये २५ जणांचा समावेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. इंग्लंड आणि अमेरिकेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही पहिलीच शॅडो कॅबिनेट असणार आहे.

मर्जीतल्या व्यक्तींनाच स्थान
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये पुन्हा एकदा स्वत:च्या मर्जीत असणार्‍या नेत्यांना स्थान दिले असून, यामध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अमेय खोपकर आणि अभिजीत पानसे यांचा समावेश असल्याचे समजते. या ठराविक नेत्यांमुळे बाकीच्या कार्यकर्त्यांना फारसे स्थान मिळत नसल्याने मनसेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.

- Advertisement -

काही मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी आणि दुसर्‍या फळीतील नेत्यांनी शॅडो कॅबिनेटमध्ये फक्त मर्जीतलेच लोक दिसत असल्याचे सांगत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?
शॅडो कॅबिनेट म्हणजे प्रत्यक्ष सरकारच्या मंत्रिमंडळावर नजर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले, मात्र अधिकृत नसलेले मंत्रिमंडळ होय. या शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांचे काम सरकारच्या मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे आहे. सरकारचा मंत्री चुकला किंवा त्याने काही अनधिकृत काम केले तर त्याचे ते कृत्य उघड करण्याचे काम शॅडो कॅबिनेटमधील मंत्री करतात.

- Advertisement -

शॅडो कॅबिनेटमधील संभाव्य मंत्री
1)बाळा नांदगावकर, गृहमंत्री, 2) संदीप देशपांडे, नगरविकास, 3) नितीन सरदेसाई, अर्थ, 4) राजू उबरकर, कृषी, 5 )रिटा गुप्ता, महिला बाल कल्याण, 6) किशोर शिंदे, कायदा सुव्यवस्था, 7) अमेय खोपकर, सांस्कृतिक मंत्री, 8) अभिजित पानसे, शालेय शिक्षण, 9) गजानन काळे, कामगार,
10) योगेश परुळेकर, सार्वजनिक बांधकाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -