घरताज्या घडामोडीमनसेचे आमदार राजू पाटील यांची ईडीकडून दोन तास चौकशी

मनसेचे आमदार राजू पाटील यांची ईडीकडून दोन तास चौकशी

Subscribe

मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) हे आज, बुधवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. तब्बल दोन तास त्यांची चौकशी (ED inquiry)  केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. पण कुठल्या प्रकरणाशी निगडित राजू पाटील हे ईडी कार्यालयात दाखल झाले होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. तसेच राजू पाटील यांना कोणत्याही प्रकारचा समन्स न बजावत, थेट त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते.

आज सकाळी अचानक मनसे आमदार राजू पाटील ईडी ऑफिसमध्ये जाताना दिसेल. पण कोणत्या कारणामुळे राजू पाटील ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. ईडीचे झोन-२च्या कार्यालयात ते पोहोचले होते. त्यांना समन्स वैगेरे आला आहे का? याबाबत विचारले असताना त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. फक्त आपण भेटायला आलो असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे सध्या राजू पाटील हे ईडी कार्यालयात का गेले होते? आणि त्यांची चौकशी का करण्यात आली? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisement -

हेही वाचा – म्हणून मी भाजप प्रवेश केला, कृपाशंकर सिंह यांनी सांगितले कारण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -