घरमहाराष्ट्रमनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट; अंतर्गत चर्चांना उधाण

मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट; अंतर्गत चर्चांना उधाण

Subscribe

गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवाय, 'मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू', असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवाय, ‘मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू’, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेच्या या भूमिकेमुळं पुण्यातील एका मुस्लिम पदाधिकाऱ्यानं देखील पक्षाचा राजीनामा दिला होता. तसंच राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळं नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी त्यावर ठाकरे यांच्या भाषणामुळे आपण बेचैन असल्याचे मत व्यक्त केलं. तसंच, याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. नगरसेवक वसंत मोरे हे मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर (लेफ्ट) पडल्याची माहिती समोर येत आहे.

एका वृत्त वाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर (लेफ्ट) पडल्याची माहिती समोर येत आहे. उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख या ग्रुपमधून वसंत मोरे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षबांधणीसाठी बनवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मतभेद दिसून येत असल्याने तसेच चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी पुण्यातील महत्वाच्या नेत्यांना आज शिवतिर्थावर बोलावले आहे. मात्र मनसेचे नगरसेवक आणि पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरेंनी पुण्यातील मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, अनिल शिदोरे आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना मुंबईत बोलावलं आहे. मात्र पुण्यातील मनसेतील मोठं नाव असलेल्या वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याचं सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणामुळे अन्य राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडणे, त्यांनी टीका करणे समजण्यासारखे आहे, मात्र पक्षाच्याच नगरसेवकांनी त्या भाषणामुळे मी बेचैन आहे असे म्हणणे योग्य नाही, असे मत मनसेचे नेते राजेंद्र वागसकर यांनी सांगितले. ९ मार्चला ठाण्यात आयोजित सभेत खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरेच त्यावर बोलणार आहेत, त्यातून मोरे यांचे समाधान होईल, असंही त्यांनी म्हटलं.

- Advertisement -

“कोणत्याही पक्षात संघटना, लोकप्रतिनिधी असे वेगळे काहीही नसते. पक्षाध्यक्षांचा आदेश महत्त्वाचा असतो व कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्याचे पालन करायचे असते, असे स्पष्ट केले. मोरे यांच्या भावनांची दखल राज ठाकरे घेतील. याच विषयावर राज्यातील अन्य राजकीय पक्षांनीही बरेच भाष्य केले आहे. त्यामुळेच ९ मार्चला ठाण्यात पक्षाध्यक्ष ठाकरे यांची सभा होणार असून ते स्वत:च या सर्व गोष्टींना उत्तर देतील”, असं वागसकर यांनी म्हटलं.


हेही वाचा – ‘ठाण्यात ‘उत्तर सभा’ होणारच, शिवाजी पार्कपेक्षा आक्रमक मुद्दे मांडणार’ – बाळा नांदगावकर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -