घरताज्या घडामोडीसंजय राऊत... मेरा पैसा वापस कर, मोहित कंबोजचे ट्विट

संजय राऊत… मेरा पैसा वापस कर, मोहित कंबोजचे ट्विट

Subscribe

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी गेल्या काही दिवसांमध्ये मोहित कंबोजवर पीएमसी बॅंकेचा पैसा गोरेगाव पत्रा चाळीच्या विकासात वापरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मोहित कंबोजने या संपूर्ण प्रकरणात खुलासा केला होता. संजय राऊत मोहित कंबोजला ओळखत नाही, असे सांगितल्यावर त्यांनी गणपतीला आलेला फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअऱ केला होता. तसेच आर्थिक अडचणीत असताना संजय राऊतांना पैशांची मदत केल्याचेही ट्विट केले होते. जवळपास २५ लाख रूपयांची मदत केल्याचे या ट्विटमध्ये नमुद करतानाच झालेल्या व्यवहाराचा स्क्रिनशॉटही शेअर करण्यात आला होता. पण आता मोहित कंबोजने संजय राऊतांकडे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. मोहित कंबोजने एक ट्विट करत संजय राऊतांना ‘मेरा पैसा वापस कर’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

रॉयल मराठा एंटरटेनमेंट या कंपनीच्या माध्यमातून संजय राऊतांनी दोन चित्रपटाची निर्मिती केली. त्यामध्ये २०१४ सालच्या बाळकडू चित्रपटासाठी संजय राऊत यांना मोहित कंबोजने आर्थिक मदत केली होती. त्यासाठी एकुण दोनवेळा पैसे दिले होते. त्यामध्ये १० लाखांचा चेक आणि १५ लाखांचा चेक दिल्याचा स्क्रिनशॉट हा मोहित कंबोजने शेअर केला आहे. तसेच आपल्याला ओळखत नसलेल्या व्यक्तीने २५ लाख रूपये घेतल्याचेही म्हटले. संजय राऊतांची खरी ओळख जगासमोर आणणार असल्याचेही ट्विटमध्ये म्हटले होते.

- Advertisement -

संजय राऊतांनी मोहित कंबोजने गोरेगाव पत्राचाळीसाठी पीएमसी बॅंकेचा पैसा वापरल्याचे म्हटले होते. तसेच १२०० कोटींची जमीन १०० कोटींचा घेतल्याचा आरोप मोहित कंबोजवर केला होता. १० लाख चौरस फुट दराने जमीन १०० कोटींना घेतली तेव्हा इतकी महाग जमीन मुंबईत आहे का ? असाही प्रश्न त्यांनी केला. माझ्या कंपनीने २०१० मध्ये गुरू आशिषकडून जमीन खरेदी केली होती. माझे पैसे बुडवल्यासाठी तक्रार करणारी व्यक्ती स्वतः मी होतो. मी जमीन खरेदी केली होती, माझे या व्यवहारात पैसे बुडाले. म्हाडाची जमीन कॉंग्रेस आणि एनसीपीचे सरकार असताना पत्रावाला चाळीत सर्व पॉवर्सचे उल्लंघन करत सनी वधावानला चुकीच्या पद्धतीने ही जागा दिली. याठिकाणी पुर्नवसन झाले नाही. त्यामुळेच गुरूआशिष विरोधात २०१५ मध्ये गुरू आशिष देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातच एफआय़आर झाली. ईओडब्ल्यूकडेही माझीच तक्रार कोणाची आहे. कारण माझे पैसे बुडाले आहेत. त्यामुळे जी चौकशी करायची आहे, ती चौकशी करा असेही आव्हान मोहित कंबोज यांनी दिले होते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -