घरमहाराष्ट्र‘माउंटन रन’ जल्लोषात; ४५०हून अधिक डोंगरप्रेमींचा सहभाग

‘माउंटन रन’ जल्लोषात; ४५०हून अधिक डोंगरप्रेमींचा सहभाग

Subscribe

‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’चे औचित्य साधून ‘गिरिप्रेमी’ने आयोजित केलेल्या ‘माउंटन फेस्टिव्हल’मधील ‘माउंटन रन’ व ‘वॉकेथॉन’ वेताळ टेकडीवर जल्लोषात पार पडले. ४५० हून अधिक स्पर्धकांनी अतिशय उत्साहाने यात सहभाग नोंदवला.

‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’चे औचित्य साधून ‘गिरिप्रेमी’ने आयोजित केलेल्या ‘माउंटन फेस्टिव्हल’मधील ‘माउंटन रन’ व ‘वॉकेथॉन’ वेताळ टेकडीवर जल्लोषात पार पडले. ४५० हून अधिक स्पर्धकांनी अतिशय उत्साहाने यात सहभाग नोंदवला. प्रो गट (१० किलोमीटर), अमेच्युअर गट (१० किलोमीटर), लहान मुले (५ किलोमीटर), वॉकेथॉन (५ किलोमीटर) अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातून ३ पुरुष आणि ३ महिला विजेते निवडण्यात आले. आज सकाळ सहा वाजता कामायनी मुनोत हॉल, गोखले नगर येथे ‘माउंटन रन’ला ‘यशदा रियल्टी’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष श्री. वसंत काटे यांच्या हस्ते ‘माउंटन रन’चे फ्लॅग ऑफ करण्यात आले. चारही गटातील स्पर्धकांनी अतिशय उत्साहामध्ये वेताळ टेकडीवरील निसर्ग पायवाटेतून धावत स्पर्धा पूर्ण केली.

स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यात वसंत काटे यांच्यासोबत उद्योजक श्री. रोहिदास गवारे, वन विभागाच्या अधिकारी श्रीलक्ष्मी अन्नाबठूला, विखे पाटील मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका मृणालिनी भोसले व ‘गिरिप्रेमी’चे विश्वस्त आनंद पाळंदे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले. या ‘रन’ला अबालवृद्धांनी भरघोस प्रतिसाद दिला. पुणे, मुंबई, जळगाव, नागपूर अशा विविध भागातून आलेले डोंगरप्रेमींनी यात सहभाग नोंदवला. यामुळे ‘डोंगर वाचवा- डोंगर जगवा’ या संकल्पनेला मोठे पाठबळ मिळाले व डोंगरांविषयी अधिकाधिक जनजागृती होण्यास मदत मिळाली. ‘गिरिप्रेमी’ने आयोजित केलेल्या या ‘माउंटन रन’ची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने देखील घेतली असून त्यांच्या ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’च्यााशी ही ‘रन’ संलग्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -