घरमहाराष्ट्र१४ फेब्रुवारीला मुलीचं लग्न, आईला हवंय संरक्षण

१४ फेब्रुवारीला मुलीचं लग्न, आईला हवंय संरक्षण

Subscribe

'कंजारभाट समाजातील काही समाजकंटक माझ्या मुलीच्या लग्नात गोंधळ घालू शकतात. त्यामुळे पोलीस संरक्षणाची द्यावे', अशी मागणी वधूच्या आईने केली आहे. 

सध्या तरुणांमध्ये १४ फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाईन डे’चा उत्साह मिळत आहेत. आपला व्हॅलेंटाईन डे कसा स्पेशल बनवता येईल, याविषयी अनेकजण खास बेत आखतात. काही जोडपी तर मुद्दाम ‘व्हॅलेंटाईन डे’लाच लग्न करतात. पिंपरी-चिंचवडमधील एका तरूणीचंसुद्धा उद्या (व्हॅलेंटाईन डेला) लग्न आहे. मात्र, कंजार भाट समाजातील या वधूच्या आईने मुलीच्या लग्न समारंभासाठी चक्क पोलीस संरक्षण मागिलते आहे. सदर वधूच्या आईने  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे यासंदर्भात लेखी अर्ज दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ‘कंजारभाट समाजातील काही समाजकंटक माझ्या मुलीच्या लग्नात गोंधळ घालू शकतात. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षणाची गरज आहे’, अशी मागणी वधूच्या आईने अर्जाद्वारे केली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी १४ फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पिंपरी-चिंचवड मधील एका तरुणीचा विवाह पार पडणार आहे. मात्र, कंजार भाट समाजातील समाजकंटक तरुण-तरुणी या लग्न सोहळ्यात विघ्न आणण्याची भीती मुलीच्या घरच्यांना आहे. त्यामुळेच तिच्या आईने लग्न समारंभात पोलीस संरक्षण मिळावे असा अर्ज दिला आहे. सदर मुलीचा विवाह हा कंजार भाट समाजाच्या रूढी परंपरने संपन्न होणार असून, समजातील काही तरुण-तरुणी आणि त्यांचे सहकारी जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी करतील, असं मुलीच्या आईचं म्हणणं आहे.

- Advertisement -

जानेवारी २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या एका विवाह सोहळ्यात काही तरुणांनी, कंजार भाट समाजातील रूढी परंपरेला विरोध दर्शवणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली होती. बहुधा याच धर्तीवर सदर मुलीच्या आईने पोलीस संरक्षणाची मागणी केली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, २०१८ मध्ये घडलेल्या त्या घटनेनंतर अनेक तरुण-तरुणी एकवटले होते आणि त्यांनी समाजातील रूढी परंपरेला छेद देत लढा उभा केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -