घरमहाराष्ट्रमुंबई-गोवा महामर्गावर वाहतूककोडींमुळे ४ किमी गाड्यांची रांग

मुंबई-गोवा महामर्गावर वाहतूककोडींमुळे ४ किमी गाड्यांची रांग

Subscribe

रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे मुंबई - गोवा महार्गावर आज वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याचे चौपदरीकरण करत असल्यामुळे तब्बल चार किलोमीटर वाहनांच्या रांगा महामार्गावर दिसून आल्या.

गोवा किंवा कोकणला जाण्यासाठी जर तुम्ही मुंबई गोवा महार्गाचा अवलंब करत असाल तर एकदा विचार करा. कारण मुंबई – गोवा महामर्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. महामर्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक धिम्म्या गतीने सुरु आहे. नाताळ आणि नवीन वर्षाचा वेळ असल्यामुळे अनेकांनी गोवा किंव कोकणला जाण्याचा बेत आखला होता. शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे असलयामुळे या मार्गावर होणारी वाहतूक ही सामान्य दिवसांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात होते. आज चौपदरी रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे मागील काही तासांमध्ये वाहणांच्या रांगा लागल्या होत्या. पेण- वडखळ दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान या वाहतूक कोंडीमुळे येथून प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होत आहे.

अपघाताचे वाढते प्रमाण

मुंबई गोवा महार्गावर अपघाताच्या घटना घडत असतात. काही भागात रस्ते खराब अवस्थेत असल्यामुळे हे अपघात आझे आहे. परवाच डंपर व टॅम्पो यामध्ये झालेल्या धडकेत १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती. यारस्त्याला सुधरवण्याचे काम सुरु आहे. रस्ता रूंद करण्याच्या कामामुळे येथे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -