घरमहाराष्ट्रमुंबईत पहिल्याच पावसामुळे डोळ्यादेखत वाहुन गेल्या गाड्या, तर कुठं खांबाला बांधल्या

मुंबईत पहिल्याच पावसामुळे डोळ्यादेखत वाहुन गेल्या गाड्या, तर कुठं खांबाला बांधल्या

Subscribe

मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मान्सुनचे आगमन झाले परंतु पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण झाली आहे. तासभर पडलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने काही गाड्या वाहून गेल्या आहेत. तर काही जणांनी आपल्या गाड्याच रशीने जवळ असलेल्या खांबाला बांधून ठेवल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुंबईत दुपारी पावसाने हजेरी लावली. जोरदार आलेल्या पावसामुळे मुंबईकर चांगलेच सुखावले आहेत. मुंबईकरांना थोडा उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे वाहन चालक आणि घरी परतणाऱ्या मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. सायन, अंधेरी आणि विले पार्ले परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचल्यामुळे वाहतूक मंदावली आहे. याचा परिणाम वेस्टर्न एक्सप्रेसवर झाला आहे. अंधेरीपासून ते दहिसर, गोडबंदर रोडपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.

- Advertisement -

दुसरीकडे मुंबईतील दादर पासून ते अंधेरीपर्यंत काही सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबलं आहे. सबवेमध्ये पाणी तुंबल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच या सबवेमधून काही वाहने वाहून गेली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. काही ठिकाणी तर वाहने वाहून जावू नये यासाठी खांबाला रशीच्या सहाय्याने बांधण्यात आली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Photo : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, रस्ते जलमय


नालेसफाईमध्ये घोटाळा

मुंबईत नेहमी पावसाळा सुरु झाला की, नालेसफाईवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगतो. परंतु यंदा पालिकेवर प्रशासक आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नाल्यात उतरुन नालेसफाईची पाहणी केली होती. तसेच ज्या भागात पाणी तुंबेल त्या भागातील अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. परंतु पावसाची पहिली सर आणि मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. धादांत खोटं बोलणारं हे सरकार आणि यांचे अधिकारी असल्याचे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

रशीने बांधली गाडी 

अंधेरी सबवे येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे गाड्यासुद्धा अलगद पाण्याच्या प्रवाहात पुढे सरकत आहेत. गाडी वाहून जाऊ नये म्हणून वाहन चालकाने आपली गाडी जवळच्या खांबाला बांधली आहे.


हेही वाचा : Mumbai Rain : मुंबईत पावसाची दणक्यात सुरुवात; 48 तासांत मान्सून सक्रिय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -