घरमहाराष्ट्र'संमेलनाला जाऊ नये', उद्घाटक कवी महानोर यांना धमकी

‘संमेलनाला जाऊ नये’, उद्घाटक कवी महानोर यांना धमकी

Subscribe

संमेलनाचे उद्घाटक कवी ना. धों. महानोर यांना संमेलनच्या पूर्वसंध्येलाच धमकी आली आहे. त्यामुळे आयोजक चिंतेत पडले आहेत.

उस्मानाबाद येथे शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात सापडले आहे. संमेलनाचे उद्घाटक कवी ना. धों. महानोर यांना संमेलनच्या पूर्वसंध्येलाच धमकी आली आहे. त्यामुळे आयोजक चिंतेत पडले आहेत. ‘संमेलनाला जाऊ नये’, अशी फोनवरून धमकी मिळाल्याचे खुद्द ना. धों. महानोर यांनी सांगितले आहे. ही धमकी ब्राह्मण महासंघाने दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महानोर यांनी एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड करण्यात आली आहे. दिब्रेटो हे साहित्यिक नाहीत. त्यामुळे संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी दिल्याचे महानोर यांनी सांगितले. ते म्हणाले की, १० जानेवारी रोजी सुरु होणार्‍या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड एकमताने करण्यात आली. ही निवड प्रक्रिया करण्याची एक पद्धत आहे तो संकेत पाळूनच ही निवड झाली आहे. यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, हे सगळे मी त्यांना समजावून सांगितले, मात्र तरीही त्यांनी तुम्ही साहित्य संमेलनाला जाऊ नका, असे मला बजावले आहे.

- Advertisement -

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महानोर यांना तातडीने सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश दिले आहेत. धमकीचे पत्र आल्याची माहिती स्वत: महानोर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्र दिल्याचे महानोर यांनी सांगितले. विविध राज्यातून धमकीचे फोन येत असल्याचेही ते म्हणाले. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले होते. त्यानंतर ९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली होती. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित आहे. मराठी साहित्यात दिब्रिटो यांचे योगदान नाही, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांतर्फे सातत्याने करण्यात येत आहे.


हेही वाचा – अनधिकृत कार पार्किंगसाठी दंडाच्या रकमेत कपात – जाणून घ्या नवे दर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -