घरमुंबईहाफकिन संस्था आता रेबीज, स्वाइन फ्लूवर संशोधन करणार

हाफकिन संस्था आता रेबीज, स्वाइन फ्लूवर संशोधन करणार

Subscribe

देशामध्ये दरवर्षी रेबीज, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू सारख्या आजारांवर नियंत्रण व प्रतिबंध आणण्यासाठी अधिक संशोधन व चाचणी करण्याची जबादारी राष्ट्रीय रोग निवारण केंद्राकडून हाफकिनवर सोपवण्यात आली आहे.

सर्प, विचूंदंशावर प्रभावी औषधनिर्मिती करणार्‍या हाफकिन संस्थेवर राष्ट्रीय रोग निवारण केंद्राकडून आता आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशामध्ये दरवर्षी रेबीज, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू सारख्या आजारांनी मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. या आजारांवर नियंत्रण व प्रतिबंध आणण्यासाठी अधिक संशोधन व चाचणी करण्याची जबादारी राष्ट्रीय रोग निवारण केंद्राकडून हाफकिनवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या आजारांवर आता अधिक प्रभावी व सक्षम औषधांचे संशोधन होण्यास चालना मिळणार आहे.

प्राणीजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी करणार संशोधन

जगात विविध प्रकारचे प्राणीजन्य रोग आहेत. कुत्रे, माकड आदी प्राणी चावल्यावर होणार्‍या रेबीज या आजाराने दरवर्षी देशात शंभरूहून अधिक मृत्यू होतात. त्यामुळे प्राणीजन्य आजारांवर देशात संशोधन होणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्राणीजन्य आजारांवर नियंत्रण व प्रतिबंधासाठी आंतरविभागीय समन्वय योजना तयारी केली. त्याअंतर्गत क्षेत्रीय समन्वयकाने आपल्या क्षेत्रात आणि राज्यात या संदर्भात कार्यरत सर्व संस्थांशी समन्वय साधावयाचा आहे. या समन्वयातून आजारांवर संशोधन आणि चाचण्या करण्यावर भर देण्याबरोबरच नागरिकांमध्ये जागरुकता करण्याची महत्त्वाची जबाबदारीही समन्वय संस्थेला पार पाडायची आहे. त्यामुळे देशातील क्षेत्रीय समन्वयाचे काम करणार्‍या संस्थांकडे वेगवेगळ्या प्राणीजन्य रोगांची जबाबदारी देण्याचा निर्णय राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने घेतला आहे. त्यानुसार रेबीज या रोगावर लक्ष केंद्रीत करण्याची जबाबदारीबाबत केंद्राकडून हाफकिन संस्थेकडे विचारणा करण्यात आली. त्याला हाफकिनकडून सकारात्मक प्रतिसाद दिल्याने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने क्षेत्रीय समन्वयक म्हणून हाफकिन संस्थेची निवड केली आहे.

- Advertisement -

सध्या संस्थेमध्ये रेबीजची चाचणी केली जाते. आता हाफकिन संस्थेने ही नवीन जबाबदारी स्विकारली असून, त्याबाबतची तपशीलवार योजनाही बनवली असून, रेबीजच्या संशोधनाला आता अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षासाठी २४ लाख निधी हाफकिन संस्थेला मिळाला.  – डॉ. निशिगंधा नाईक, हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्थेच्या संचालिका (अतिरिक्त भार)

रेबीज, बर्ड फ्लू यासारख्या प्राणीजन्य आजारांवर नियंत्रण व प्रतिबंधासाठी क्षेत्रीय समन्वयक म्हणून काम करण्यासाठी हाफकिन संस्थेची राष्ट्रीय रोग निवारण केंद्राकडून झालेली निवड ही अभिमानास्पद आहे. प्राणीजन्य आजारांना प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात हाफकिन संस्था निश्चितपणे, परिणामकारक कामगिरी बजावेल.  – डॉ. निशिगंधा नाईक, संचालिका, हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्था

- Advertisement -

हेही वाचा – ‘माणदेशी’ महोत्सवाची मुंबईकरांना पर्वणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -