घरताज्या घडामोडीअनधिकृत कार पार्किंगसाठी दंडाच्या रकमेत कपात - जाणून घ्या नवे दर

अनधिकृत कार पार्किंगसाठी दंडाच्या रकमेत कपात – जाणून घ्या नवे दर

Subscribe

मुंबईत सार्वजनिक वाहनतळापासून तसेच बस स्थानकांपासून ५०० मीटरच्या परिसरात अनधिकृत वाहनांवर दहा हजारांपासून अधिक दंड आकारण्याच्या निर्णयावरून महापालिका प्रशासन तोंडघशी पडल्यानंतर आता त्यांनी या दंडाची रक्कम कमी केली आहे. महापालिकेने सहा ते बारा तासांसाठी ४५ ते ४९५ पर्यंत शुल्काची रक्कम निश्चित केली आहे. या शुल्काच्या चाळीस पटीने दंडाची रक्कम आता अनधिकृत वाहने उभी करणार्‍यांकडून वसूल केली जाणार आहे.
मुंबईतील रस्त्यांवर अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणार्‍या वाहनांवर १ सप्टेंबर २०१९ पासून पोलीसांच्या सहकार्याने कठोर कारवाई करण्यात करण्याचा निर्णय घेतला.

या अनधिकृत वाहनांवरील दंडापोटी १० हजार रुपये आणि टोचन शुल्क ५ हजार रुपये अशाप्रकारे एकूण १५ हजार रुपयांच्या दंडाची रक्कम आकारण्याचे निर्देश दिले होते. आयुक्तांच्या निर्देशानुसार सार्वजनिक वाहनतळ आणि बस स्थानकापासून ५०० मीटर परिसरातील अनधिकृत वाहनांवर कारवाई हाती घेण्यात आली. त्यानुसार कारवाईला सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाच्याविरोधात तीव्र नाराजी पसरली होती. त्यानंतर आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दंडाच्या रकमेत सुधारणा करून शुल्क आणि दंडाची रक्कम कमी करण्याचा हालचाली सुरु केली होत. त्यानुसार अखेर सुधारीत दंडाची रक्कम निश्चित करण्यात आले आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या रस्ते विभागाच्यावतीने मंगळवारी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये सहा ते बारा तासांपर्यंत अ व ब श्रेणीतील वाहनतळांसाठी शुल्क निश्चित केले आहे. यामध्ये अ श्रेणीतील दुचाकींसाठी ४५ ते ८५ रुपये, तीन व चार चाकी वाहनांसाठी १०० ते २०० रुपये, ट्कसाठी २५० ते ४९५ रुपये, ऑटो टॅक्सीसाठी १०० रुपये तसेच सार्वजनिक बससाठी १७५ ते ३५० रुपये हे सहा ते बारा तासांसाठी निश्चित करण्यात आले आहे. या शुल्काच्या रकमेवर ४० पट दंडाची रक्कम आकारली जाणार आहे.

सार्वजनिक वाहनतळांपासून ५०० मीटर परिसरात

तीन व चार चाकी :        शुल्क १०० रुपये, दंड ४ हजार रुपये
दुचाकी :                   शुल्क ४५ रुपये, दंड १८०० रुपये
ट्रक :                       शुल्क २५० रुपये, दंड १० हजार रुपये
ऑटो टॅक्सी :               शुल्क १०० रुपये, दंड ४हजार रुपये
सार्वजनिक वाहतूक बस : शुल्क १७५ रुपये, दंड ७ हजार रुपये

- Advertisement -

बेस्ट आगारांपासून ५०० मीटर परिसरात

तीन व चार चाकी :          शुल्क १०० रुपये, दंड ४ हजार रुपये
दुचाकी :                     शुल्क ४५ रुपये, दंड १८०० रुपये
ट्रक :                         शुल्क २५० रुपये, दंड १० हजार रुपये
ऑटोटॅक्सी :                  शुल्क १०० रुपये, दंड ४ हजार रुपये
सार्वजनिक वाहतूक बस :    शुल्क १७५ रुपये, दंड ७ हजार

चार प्रमुख रस्ते आणि पदपथांवर वाहने उभी केल्यास

तीन व चार चाकी :            शुल्क २०० रुपये, दंड ८ हजार रुपये
दुचाकी :                       शुल्क ८५ रुपये, दंड ३४०० रुपये
ट्रक :                           शुल्क ४९५ रुपये, दंड १९ हजार ८०० रुपये
ऑटोटॅक्सी :                    शुल्क १०० रुपये, दंड ४ हजार रुपये
सार्वजनिक वाहतूक बस :     शुल्क ३५०, दंड १४ हजार रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -