घरमहाराष्ट्रNagaland : शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का; नागालँडमधील सातही आमदारांचा अजित...

Nagaland : शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का; नागालँडमधील सातही आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

Subscribe

Nagaland : अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis government) मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजून काही आमदार त्यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली आहे. परंतु शरद पवार यांनी पु्न्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील (Nagaland) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे, तसेच तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे अजित पवारांची बाजू भक्कम झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Nagaland Sharad Pawar once again a big blow All seven MLAs in Nagaland support Ajit Pawar)

हेही वाचा – सत्तेची साठमारी, मात्र सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करू नका, ठाकरे-पवारांच्या भेटीतील कारण आले समोर

- Advertisement -

नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडियो यांनी आज नवी दिल्ली येथे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नागालँडमधील विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार निवडून आले होते. या आमदारांनी नागालँडमध्ये सत्तेत आलेल्या भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र आता याच आमदारांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांना आपला पाठिंबा जाहीर करत या संदर्भातील पत्र जारी केले आहे.

हेही वाचा – भुजबळांविरोधात ठाकरे गटाची मोर्चेबांधणी; आदित्य ठाकरे घेणार येवल्यात सभा

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांना पंधरा दिवसांतच दुसरा मोठा धक्का दिला आहे. नागालँड प्रदेशच्या संपूर्ण कार्यकरणीने आणि जिल्हाध्यक्षांनी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात नागालँडमध्ये पक्षाला मजबूत बनवायचे निश्चित केले आहे. दरम्यान, लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.

शरद पवारांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष 

नागालँडमधील आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार यांनी अद्यापही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता शरद पवार या आमदारांवर कारवाई करणार की, यांना माफ करणार हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -