घरमहाराष्ट्रगोगावलेंना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास माहिती नाही, नाना पटोले यांची टीका

गोगावलेंना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास माहिती नाही, नाना पटोले यांची टीका

Subscribe

नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही सुरताला कसे पोहचला आणि तुमच्या सोबत किती आमदार होते? यावर उत्तर देत गोगावले म्हणाले की, मी सुरतला माझ्या गाडीतून एकटाच गेलो. त्यानंतर गोगावले यांना विचारण्यात आले की, तुम्ही सूरतला का गेले होतात. त्यावर गोगावल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सूरतला गेले होते म्हणून मी गेलो होतो. गोगावले यांच्या या उत्तर नंतर अनेकांनी टीका केली आहे.

हेही वाचा… MLA Disqualification : भरत गोगावलेंनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांचे खडेबोल; “छत्रपती शिवाजी महाराजांचा…”

- Advertisement -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून टोलो लगावला आहे. यावेळी पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन हे सत्तेत येतात, पण सत्तेत आल्यानतंर महाराजांचा अपमान कसा करायचा हे विसरत नाहीत. मुळात महाराज सुरतमध्ये तिथली अत्याचारी व्यवस्था उलथवण्यासाठी गेले होते, हा इतिहास गोगावले यांना माहिती नाही. त्यामुळे त्यांना इतिहास सागितला पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लोकांचा लुटलेला खजिना परत आणण्यासाठी सुरतला गेले होते. पण तुम्ही गुजरातच्या गुलामीत गेला होतात. त्या हॉटेलमध्ये तुम्हाला कशी वागणूक देण्यात आली. कस कस्टडीत ठेवलं होतं. सुरतमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांचे कशी हालत करण्यात आली होती हे आम्ही सर्वांनी व्हिडीओ मध्ये पाहिलं आहे. असं ही नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा… आघाडीतील जागावाटप मेरीटनुसार होईल; नाना पाटोले यांनी दिली माहिती

मी सत्ताधाऱ्यांना सांगतो की, त्यांनी त्यांची स्वत:ची आणि शिवाजी महाराजांची तुलना करू नये. हे लोक त्या लायकीचे नाही. ज्या पध्दतीने हे लोक शिवाजी महाराजांचा अपमान करायला निघाले आहेत ते अजिबात सहन होणार नाही. यांच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकदा शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महत्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. या सरकारमधील लोकांनी आमच्या महापुरुषांचा आणि दैवतांचा अपमान करण्याचा सपाटाच लावला आहे. अशी टिका नाना पटोले यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -