घरमहाराष्ट्रNanded Hospital : अखेर नांदेड शासकीय रुग्णालयातील डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Nanded Hospital : अखेर नांदेड शासकीय रुग्णालयातील डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Subscribe

नांदेड शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणजेच डीन डॉ. श्याम वाकोडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकीच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

नांदेड : जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी (ता. 02 ऑक्टोबर) 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ज्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. परंतु, या रुग्णालयात सुरू असलेला रुग्णांच्या मृत्यूचा तांडव अद्यापही थांबलेला नाही. किमान एक तरी रुग्ण मरण पावल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे राज्यातील वैद्यकीय सेवेवर प्रश्न उपस्ठित करण्यात येत आहेत. तर रुग्णालयात निर्माण झालेल्या औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याचे आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. परंतु आता नांदेड शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणजेच डीन डॉ. श्याम वाकोडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Nanded Hospital : case of culpable homicide has been registered against Dean of Nanded Government Hospital)

हेही वाचा – टेंडर निघाल्यानंतर कंपनीची स्थापना… किरीट सोमय्या यांचा सुजीत पाटकरांवर थेट आरोप

- Advertisement -

डीन वाकोडे यांच्यासह याच रुग्णालयातील बालरोग विभागातील डॉक्टरवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकीच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधीच 31 रुग्णांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे चिंतेत सापडलेले डीन या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर मोठ्या संकटात सापडलेले आहेत. नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि आज तिचा सुद्धा मृत्यू झाला. पण या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत रुग्णालय प्रशासनावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

- Advertisement -

या प्रकरणी महिलेचे नातेवाईक कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रात्री 1 वाजेच्या सुमारास अंजली यांची नैसर्गिक प्रसूती होऊन तीला मुलगी झाली. प्रसूती झाली तेव्हा अंजली व तिच्या बाळाची तब्येत चांगली असल्याचे तेथील डॉक्टरांनी व स्टाफने सांगितले. त्यानंतर, सकाळी अंजली हीचे रक्त जास्त जात असल्याचे आणि बाळाची तब्येत बिघडली असल्याची माहिती डॉक्टारांकडून देण्यात आली. तसेच, रक्ताचे व पेशीच्या पॉकेटसह इतर औषधे बाहेरुन आणण्यासाठी सांगितले गेले.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार कामाजी टोम्पे यांनी औषधे बाहेरून आणून दिली. परंतु, त्या ठिकाणी कोणतेही डॉक्टर हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी डीन वाकोडे यांच्याकडे धाव घेतली. माझ्या मुलीची व तिच्या बाळाची प्रकृती गंभीर असून रक्त जास्त जात आहे. तुम्ही ताबडतोब डॉक्टर पाठवा, अशी विनंती टोम्पे यांनी केली. परंतु, त्यांनी कोणतीही हालचाल न करता मुद्दामहून कामाजी टोम्पे यांना तिथेच बसवून ठेवले. बराच वेळ झाल्यानंतरही कोणतेही डॉक्टर व नर्स पाठवण्यात आले नाही. अंजली आणि त्यांचे बाळ मरणाच्या दारात असताना सुद्धा डीन वाकोडे यांनी कोणतेही हालचाल केली नाही, असा स्पष्ट आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -