घरठाणेट्रान्स हार्बर मार्गावर बेलापूर ते पनवेल लोकल नाही; प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण

ट्रान्स हार्बर मार्गावर बेलापूर ते पनवेल लोकल नाही; प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण

Subscribe

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील गोंधळ काही संपण्याचे नाव घेत नाही. गेल्या चार दिवसांपासून हार्बर रेल्वे मार्गावरील लोकक गाड्यांचे वेळापत्रक हे विस्कळीत झाले असून ते अजूनही सुरळीत झालेले नाही. बेलापूर ते पनवेल ट्रान्स हार्बर लोकल धावणार नसल्याची उद्धोषणा ही रेल्वे स्थानकात करण्यात आली आहे. तर केवळ ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते बेलापूर स्थानकापर्यंत लोकक धावणार आहे. लोकल गाड्या अचानक रद्द केल्याने प्रवासींमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

पनवेल येथील यार्ड रीमॉडेलिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे लोकक बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत ठाणे पनवेल लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे.ठाण्याहून केवळ बेलापूर पर्यंत लोकल धावत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – शनिवारी रात्री हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक; शेवटची लोकल किती वाजता सुटणार?

लोकल गाड्या रद्द करण्याची कोणतीही पूर्वसूचना रेल्वे स्थानकात करण्यातआली नाही. यासंदर्भातील माहिती देखील दिली जात नव्हती. लोकल गाड्या रद्द होण्याचे कारण जनसंपर्क विभागाकडून दिले जात नव्हते. तसेच पनवेल रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म नंबर बदलण्यात आल्याचे माहिती देखील प्रवाशांना दिली नाही. हार्बर मार्गावरील 38 तासांचा मेगब्लॉक घेण्यात आला होता. पण हा ब्लॉक वाढवण्यात आल्याचे देखील रेल्वे प्रशासनाकडून सांगितले नाही. यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात संताप आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -